डोंबिवली मध्ये शिवसेनेतर्फे घरेलु कामगार आणि दिव्यांगांची नोंदणी सुरु - दैनिक शिवस्वराज्य

डोंबिवली मध्ये शिवसेनेतर्फे घरेलु कामगार आणि दिव्यांगांची नोंदणी सुरु


प्रशांत आडसर बदलापूर प्रतिनिधी :-

डोंबिवली मध्ये महाराष्ट्र शासनाच्या  विविध योजनांचा लाभ सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने महिला घरेलु कामगार संघटना आणि दिव्यांग संघटनेची स्थापना करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेच्यावतीने घरेलु कामगार आणि दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली.यावेळी शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, संघटनेचे डोंबिवलीच्या अध्यक्षा स्वाती हिरवे, डोंबिवली पूर्व महिला संघटक मंगला सुळे, ग्रामीण महिला संघटक कविता गावंड, विवेक खामकर इत्यादी पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेकडो घरेलु कामगार आणि दिव्यांग उपस्थित होते. राजेश मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर शहर प्रमुख राजेश मोरे यांनी उपस्थित घरेलु कामगार आणि दिव्यांग यांना मार्गदर्शन केले. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी घरेलु कामगार आणि दिव्यांग यांना शिवसेना शाखा मदत करेल असे मोरे यांनी सांगितले. या उपक्रमात दिडशे घरेलु कामगार आणि दिव्यांग यांनी नोंदणी केली .
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads