महाराष्ट्र
उ.सोलापूर पाथरी येथे गरीब गरजू मुलांना एम.के.फाऊंडेशन व सागर सिमेंटच्या वतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-
सोलापूर (उ.सोलापूर): देशावर कोरोना महामारीचा संकट ओढवलेलं आहे,आज या महामारीतून सावरताना शाळा सुरू होत आहेत ही आनंदाची बाब आहे.लॉकडाऊनमुळे अनेक लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे.बहुतेक प्राथमिक शाळेत शिकणारी मुले ही सामान्य कुटुंबातील असतात. त्यांना या पुढील काळात शिक्षण घेणाऱ्या मुलांना अडचण भासू नये, यासाठी सागर सिमेंटच्या वतीने ५१ हजार वह्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून आज उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथे गरीब गरजू मुलांना वह्या वाटपासाठी भेट देण्याचा योग आला.
पहिल्यांदाच पाथरी येथे श्री. महादेव कोगनुरे भेट देत असल्याने तेथील सरपंचांसहित, नागरिक, शाळेतील मुले,शिक्षक,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आदींनी त्याचा उस्फुर्त असा स्वागत केले. विशेष करून मुलांच्या स्वागताने ते भारावून गेले.
निरागस मुलांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी वह्या वाटपासाठी संधी दिल्याबद्दल त्यानी विशेष करून शाळेचे आभार मानले.
यावेळी सरपंच सौ.लक्ष्मी मळगे, सामाजिक कार्यकर्ते अमोल कारंडे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत मसलखांब,संजय वाघमोडे,माने सर, जाधव सर, अतकरे सर,भोसले सर आदी मान्यवर उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा