राजकीय
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आ. प्रणिती शिंदे यांना संधी मिळणार
सलीम शेख मंगळवेढा तालुका प्रतिनिधी.
सोलापूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी केलेल्या कष्टाची पोचपावती म्हणून सोलापूर शहर मध्य च्या लोकप्रिय आमदार प्रणिती शिंदे यांना आगामी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात काँग्रेस पक्षाकडून मंत्रिपदाची संधी मिळणार आहे असा विश्वास काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी सोलापुरात बोलताना आपले मत व्यक्त केले.
त्यांच्या या बोलण्याने सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांतून व युवा वर्गात आशादायक वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता राज्य मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे व अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे.
शिंदे साहेबांचा काँग्रेस पक्षातील कार्य व त्यांनी पक्षवाढीसाठी जे अनमोल योगदान दिले हे लक्षात घेता सोलापूर शहर मध्य च्या हॅट्रिक आमदार प्रणिती शिंदे यांची लोकप्रियता पाहता व त्यांनी पक्षवाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळेल असे विश्वास काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा