राशिभविष्य
आजचे राशिभविष्य २२-०७-२०२१
आजचे राशिभविष्य २२-०७-२०२१
मेष :-
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मिश्र फलदायी राहील . अस्वास्थ्य आणि कटकटीचा अनुभव येईल . शरीरात आळस आणि थकवा जाणवेल तर मन अशांत राहील . आज संताप वाटेल आणि त्यामुळे कामे बिघडतील . व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करा . निर्धारीत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा . धार्मिक यात्रेचा बेत आखाल . आपला प्रत्येक प्रयत्न चुकीच्या मार्गाने होईल असे श्रीगणेशांना वाटते .
वृषभ :-
आजचा दिवस काळजीपूर्वक राहा अशी सूचना श्रीगणेश देत आहेत . नवीन कार्याचा आरंभ करू नका . स्वास्थ्य बिघडू शकते . खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे हिताचे ठरेल . शारीरिक थकवा आणि मानसिक व्यथा अनुभवाल . ऑफिसमध्ये कामाचा भार वाढल्याने अधिक थकवा जाणवेल . प्रवास लाभदायी होणार नाहीत . शक्य असेल तर अध्यात्मासाठी वेळ काढा .
मिथुन :-
दिवस आनंदात आणि भोग विलासात जाईल . भिन्न लिंगीय व्यक्तींशी भेट होईल . मित्र आणि प्रिय व्यक्तींसमवेत मनोरंजनात्मक प्रवास घडेल . वाहनसुख मिळेल . नववस्त्रांची खरेदी होईल व परिधान करण्याची संधी मिळेल . प्रणयासाठी उत्तम दिवस . भोजनात मिष्टान्न मिळेल . तब्बेत चांगली राहील . सामाजिक सम्मान आणि प्रसिद्धी मिळेल . वैवाहिक सुख चांगले मिळेल . दिवसभर गणेशाची कृपा राहील .
कर्क :-
श्रीगणेश सांगतात की आज दिवस चांगला जाईल . घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील . सुखद प्रसंग घडेल . हाती घेतलेल्या प्रत्येक मात यश मिळेल . तब्बेत चांगली राहील . गीयांसमवेत आनंदात वेळ जाईल . नोकरदारांना नोकरीत लाभ होतील . कनिष्ठांकडूनही फायदा मिळेल . मैत्रीण भेटल्याने आनंद होईल . शत्रूवर विजय मिळवाल .
सिंह :-
आजचा दिवस आनंदात जाईल . अधिक कल्पनाशील बनाल . साहित्य नवनिर्मितीमुळे काव्य लेखनाची प्रेरणा मिळेल . आवडत्या व्यक्तीची भेट फलस्वरूप होईल व त्यामुळे दिवसभर मन आनंदी राहील . संततीच्या दृष्टीने प्रगतीच्या वार्ता मिळतील . अभ्यासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना खूप चांगला दिवस आहे . मित्र भेटतील . स्त्री वर्गाकडून लाभ होईल . श्रीगणेशांच्या मते आज आपल्या हातून परोपकार घडेल .
कन्या :-
आजचा दिवस आपणाला चांगला नाही असे श्रीगणेश सांगतात . शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल . काही अडचणींमुळे मन दुःखी राहील . स्फूर्तीचा अभाव असेल . स्वकीयांचे गैरसमज होतील . आईची तब्बेत बिघडेल . घर , जमीन इ . कागदपत्रे जपून ठेवा . स्त्री आणि पाण्यापासून हानी होण्याचे भय . इतरांसमोर अपमान होणार नाही याची दक्षता घ्या . नाहक खर्च होईल .
तूळ :-
आजचा दिवस शुभ फलप्राप्तीचा आहे असा संकेत श्रीगणेश देतात . भावंडांशी संबंध चांगले राहतील . त्यांच्याशी घरविषयक प्रश्नांची चर्चा होईल . एखाद्या छोटया धार्मिक ठिकाणी जाण्याचे यशस्वी नियोजन कराल . धनलाभ होईल . परदेशातून चांगल्या वार्ता मिळतील . व्यावहारीक कारणांनी यात्रा कराल . नव्या कामाचा आरंभ करण्यास चांगला दिवस . शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल . गुंतवणूक करण्यास दिवस चांगला आहे . भाग्योदयाचा दिवस .
वृश्चिक :-
श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस साधारणच आहे . नाहक खर्चावर नियंत्रण ठेवा . कुटुंबात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या . कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज दूर करा . शारीरिक त्रास आणि मनात मरगळ राहील . नकारात्मक विचार करू नका . अनैतिक कार्यापासून अलिप्त राहाल . विद्यार्थ्यांना अध्ययनात अडथळे येतील .
धनु :-
आज धार्मिक प्रवास होईल असे संकेत श्रीगणेश देतात . ठरविलेली कामे पूर्ण होतील . शरीर व मन स्वस्थ असेल ज्यामुळे उत्साही व आनंदी असाल . कुटुंबात मंगल कार्ये ठरतील . स्वकीयांशी गप्पागोष्टी होऊन मन प्रसन्न राहील . समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल .
मकर :-
आज धार्मिक व अध्यात्मिक विषयात रस राहील . त्याच कामात मग्न राहाल . तसेच त्यासाठी खर्च देखील करावा लागेल . कोर्ट कचेरी संबंधी कामे निघतील . व्यावसायिक कामात विघ्न येतील . मित्रांच्या प्रतिष्ठेची हानी होईल . उत्साह आणि प्रसन्नता नाहीशी होईल . अपघात व ऑपरेशन पासून सांभाळून राहा . कष्टाच्या मानाने फळ मिळणार नाही म्हणून निराश व्हाल .
कुंभ :-
आजचा दिवस फायदयाचा आहे असे श्रीगणेश सांगतात . व्यवसायात आज लाभ होईल . मित्र भेटतील त्यामुळे आनंद होईल . त्यांच्या बरोबर प्रवासही ठरवाल . नवीन कामाची सुरूवात फायदेशीर ठरेल . विवाहेच्छंना आशादायक .
मीन :-
श्रीगणेश सांगतात की आज आपला दिवस शुभफल देणारा जाईल . कामे यशस्वी होतील आणि वरिष्ठ अधिकारी संतुष्ट असतील त्यामुळे आनंदी दिवस जाईल . व्यापाऱ्यांच्या व्यापारात वाढ होईल . वडील आणि वाडवडील यांच्याकडून फायदा होईल . लक्ष्मीची कृपा राहील . कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील . आरोग्य चांगले राहील . सरकारकडून फायदा होईल . मान- सम्मान मिळेल . पदोन्नती होईल . कौटुंबिक जीवन आनंददायी राहील .
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा