महाराष्ट्र
अनिल नांगरे यांचा भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूर तालुका चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल कुरघोट ग्रामस्थांकडून सत्कार
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी :-
द.सोलापूर : भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते व माजी सहकार मंत्री तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष (बापु) देशमुख यांचे निकटवर्तीय व युवा नेते मनिष देशमुख यांचे विश्वासू सहकारी मा.श्री.अनिल नांगरे यांचा भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूर तालुका चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल कुरघोट ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. त्यावेळी कुरघोटचे सरपंच श्री बनसिध्द बन्ने यांचे चिरंजीव यल्लाप्पा बन्ने व पिंटु बन्ने, माजी सरपंच वसंत बन्ने यांचे चिरंजीव लगमण्णा बन्ने, आरिफ शेख, रफीक शेख, रजनीकांत सासवे, नंदकुमार शेंडगे व तेलगावचे युवा नेते अप्पु बिराजदार व बलभिम कोळी कुसुर खानापूरचे उपसरपंच संतोष माशाळे, सुनील नांगरे, अनिल पुजारी, सोहम अळिगीडा, रमेश कोळी, बाळु कोळी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा