पुरग्रस्थांना सुधागड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मदतीचा हात; महिला जिल्हा अध्यक्षा गीता पालरे यांच्या नेतृत्वाखाली जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - दैनिक शिवस्वराज्य

पुरग्रस्थांना सुधागड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मदतीचा हात; महिला जिल्हा अध्यक्षा गीता पालरे यांच्या नेतृत्वाखाली जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


सुधागड /कोंडगाव :- राम तुपे

सुधागड पाली : एक हात मदतीचा असे अपील करत सुधागड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाड येथील पुरग्रस्थांना जीवनावश्यक वस्तू व साहित्याचे वाटप करण्यात आले. आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड महिला जिल्हाध्यक्षा गीता ताई पालरेचा यांच्या नेतृत्वाखाली ही मदत देण्यात आली.
    यावेळी सुधागड तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाडमध्ये नवेनगर, पंचशिल नगर आदी परिसरातील नागरिकांना ब्लँकेट, पाण्याच्या बॉटल, चादरी, बिस्किट पुडे, टॉवेल, चटया, फरसाणची पाकिटे अश्या विविध वस्तूंचे वाटप केले. तालुक्यातील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अशा कठीण परिस्थितीत एकत्र येऊन मदत व श्रमदान करत आहेत. अशी माहिती जिल्हाध्यक्षा गीता पालरेचा यांनी सकाळला दिली. यावेळी गीता पालरेचा यांच्यासह रमेश साळुंखे, संदेश शेवाळे, सुलतान बेणसेकर, किरण मढवी, सुशील शिंदे, किरण खंडागळे, ललित ठोंबरे, राकेश बेलोसे, अविनाश माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads