प्रयास सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षांचा वाढदिवस साजरा - दैनिक शिवस्वराज्य

प्रयास सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षांचा वाढदिवस साजरा



प्रतिनिधी : रविना यादव

        मित्रांनो दैनंदिन जीवनामध्ये सध्या एकावर एक अशी निसर्गाची चक्रे फिरू लागली आहेत. कधी पूर तर कधी वादळे, जंगलच्या जंगल नष्ट झाली आरसीसी जंगल उभे राहिले. सगळ्या ला जबाबदाऱ  असेल तर आपणच आणि फक्त कळवळा झाडे लावण्याचा जगवण्याचा आणि लावून लावून कोणती झाडे लावतात *विदेशी*  लोक हो आता तरी थांबा या निसर्गाची हा क्रूर खेळ थांबवा. ठीक आहे काळ बदलत गेला आपणही बदललो परंतु आता गरज आहे ती पुन्हा पेटून उठण्याची आणि आपला भारत देश महाराष्ट्र जिल्हा तालुका गाव हरित करण्याची वेळ आली आहे. याच निमित्ताने मागील सात वर्षांपूर्वी आम्ही सुरुवात केली. एक छोटेसे रोपटे लावले आज त्याचा वटवृक्ष झाला. हुतात्मा नगरी ऐतिहासिक नगरी ! याच नगरीला वारसा लाभला  तो म्हणजे वटवृक्ष *वडाच्या झाडाचा.*अनेक वर्षे वडाची झाडे उघडू ची शान होती एक ओळख होती. कालांतराने रस्ते वाहतूक यानिमित्तानं त्याच्यावरती कुऱ्हाड पडली आणि वडूज शहर ओसाड झाले.  
 विकासाच्या नावाखाली पिढ्यानपिढ्या सावली व पक्षांना आश्रय देणारे आपल्याला सावली देणारे वटवृक्ष नष्ट झाली.परंतु आम्ही मानस केला आता पुन्हा तीच ओळख निर्माण करायची. याच निमित्ताने सण 2016 साली वृक्षारोपण मोहीम हाती घेतली. पहिल्या वर्षीच जलवाहिनी येरळा नदीच्या तीरावरती एकूण 24 वडाची झाडे लावली आणि त्याचे दिवस रात्र संवर्धन केले आणि ती जगविली. आज ती पाच वर्षाची झाली. आता तिथे गेल्यानंतर खुप समाधान मिळते. कष्टाचे चीज झाले. त्यानंतर अव्याहत पने वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन मोहीम राबविण्यत आल्या. या निमित्ताने आज या झाडांचा 5 वा वाढदिवस महाराष्ट्रीयन फेटा बांधून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. येत्या काळात ही वडाची झाडे महाकाय अवतार धारण करतील. यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर साहेब, व शहरातील विविध मान्यवर पत्रकार बंधू , पर्यावरण प्रेमी, तसेच प्रयास सामाजिक विकास संस्था चे सर्व शिलेदार उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads