महाराष्ट्र
मुंबईत बस कंडक्टरला एका वर्षाचा कारावास, 15 हजाराचा दंड 13 वर्षाच्या मुलीचा विनयभंग
राकेश कोळी उपसंपादक :-
मुंबईतील 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बस कंडक्टरला एक वर्ष तुरंगवास व १५ हजार दंडाची शिक्षा एका विशेष न्यायालयाने सुनावली आहे. न्यायालयाने संबंधित प्रकरणातील आरोपी चंद्रकांत सुदाम कोळीला POCSO कायद्याच्या कलग १२ अंतर्गत दोषी ठरवले असून १५ दंड न भरल्यास तीन महिन्यांचा तुरुंगवास ही भोगावा लागणार आहे
ही घटना जुलै २०१८ मधील असून मुंबईतील एका पूर्व उपनगरमध्ये राहणारी ही १३ वर्षांची मुलगी दररोज सरकारी बसने शाळेत ये-जा करत होती. घटनेच्या दिवशी या बसमध्ये केवळ २ ते ३ जण प्रवासी बसलेले होते. यावेळी बस कंडक्टर चंद्रकांत कोळी हा पीडीत मुलीजवळ जावून बसला आणि तिच्याशी अश्लील बोलत तिचा विनयभंग केला. यावर पीडीताने मला असे प्रश्न विचारु नका म्हणून खडसावले असता कंडक्टर काही वेळासाठी तिथून निघून गेला. परंतु, परत आल्यावरदेखील त्याने त्या पीडीताला असेच प्रश्न केले. त्यावर पीडीतानेदेखील मला असे काही विचारु नका म्हणून सांगितले. काही दिवसांनंतर मुलीने शाळेत जाण्यास टाळाटळ व नकार देत असल्यामुळे पिडीताच्या आईने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने माहिती दिली नाही. याबाबत आईने पिडीताच्या मित्र मैत्रिनींना विचारले असता तीला खरे कारण कळाल्यावर पिढीतल्या आईने थेट बस डेपोत गाठले. यावेळी तिने पठडीतला आरोपीची ओळख करायला लावली. त्यानंतर आईने त्या आरोपीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा