पुण्यात भररस्त्यात मायलेकराला गुंडांकडून बेदम मारहाण - दैनिक शिवस्वराज्य

पुण्यात भररस्त्यात मायलेकराला गुंडांकडून बेदम मारहाण


पुणे प्रतिनिधी :- जयसिंग शिंदे

पुणे, 28 जुलै : पुण्यातील  हडपसर परिसरात एका किरकोळ कारणातून मायलेकराला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीनं आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं पीडित मायलेकराला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. या हल्ल्यात दोघा मायलेकांना चांगलीच दुखापत झाली आहे. याप्रकरणी पीडित तरुणानं हडपसर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलिसांनी अद्याप या गुन्ह्यात कोणालाही अटक केली नसून घटनेचा तपास सुरू केला आहे.

गणेश डोंगरे असं मारहाण झालेल्या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो हडपसर परिसरातील गाडीतळ येथील रहिवासी आहे. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास फिर्यादी गणेश आपल्या आईसोबत तुळजाभवानी वसाहतीसमोरील रस्त्यावरून जात होता. दरम्यान गणेशचा आरोपी तरुणाला धक्का लागला. या किरकोळ कारणातून राग आल्यानं आरोपी तरुणानं आपल्या काही साथीदारांना बोलवून घेतलं. आणि गणेशला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
आपल्या मुलाला होणारी मारहाण पाहून फिर्यादी तरुणाची आई मध्यस्थी करण्यासाठी भांडणांत पडली. पण संतापलेल्या तरुणांनी दोघां मायलेकराला लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण केली. भररस्त्यात मारहाण झाल्यानं परिसरात अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. मारहाण केल्यानंतर संबंधित आरोपींनी पीडित तरुणाला धमकावत घटनास्थळावरून निघून गेले. यानंतर पीडित तरुणानं हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तिघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads