महाड जिल्हा रायगड येथे एम. के. फाउंडेशनच्या वतीने नुकसानग्रस्त भागात जीवनाश्यक वस्तुंचे वाटप - दैनिक शिवस्वराज्य

महाड जिल्हा रायगड येथे एम. के. फाउंडेशनच्या वतीने नुकसानग्रस्त भागात जीवनाश्यक वस्तुंचे वाटप


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी :-

रायगड दि.२७ : महाड जिल्हा रायगड येथे एम. के. फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्त कुटुंबाना मदत संस्थापक महादेव कोगनुरे  यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त बांधवाना जीवनावश्यक वस्तुसंह, साड्या, कपडे, टॉवेल, नॅपकिन आणि पाणी बॉटल या साहित्य वाटप करण्यात आले.
 
अतिवृष्टीमुळे या भागात प्रचंड मोठे नुकसान झाले आहे, बाजारपेठांमधील स्थिती तर फार भयानक आहे, दुकानात काहीच शिल्लक राहिलेले नाही व पिण्याच्या पाण्याचा देखील तुटवडा आहे, तर काहींचे संसार उघड्यावर आले आहेत.

गरजेच्या वेळी तातडीने  एम के फाऊंडेशनची मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहचली असल्याने ती मदत स्वीकारताना काही लोक फार भावूक झाले होते, त्यांच्या ह्या कठीण काळात त्यानी त्यांच्या काहीश्या प्रमाणत तरी कामाला येण्याचा त्याचा प्रयत्न आहे. तसेच एम के फाऊंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी पूरग्रस्त भागातील अनेक कुटुंबांना भेटून त्यांची विचारपूस केली.

या प्रसंगी रवी मुंढे सचिव भाजपा महाराष्ट्र प्रदेश, सामाजिक कार्यकर्ते अमोल कारंडे, उद्योजक सोमनाथ होसाळे आदी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads