राशिभविष्य
आजचे राशिभविष्य ०७-०७-२०२१
आजचे राशिभविष्य ०७-०७-२०२१
मेष :-
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असेल . कुटुंबातील सदस्यांबरोबर सुंदर भोजन करणे तसेच आनंदात वेळ घालवणे याचा योग येईल . आर्थिक बाबतीत भविष्या साठी चांगले प्लेनिंग करू शकाल . लक्ष्मीदेवीच्या कृपेने मिळकतीत वाढ होईल . कलाकार , कारागिर यांना त्यांच्या कलेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल आणि त्याची कदरही केली जाईल . नकारात्मक विचारापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात .
वृषभ :-
आजचा दिवस उत्साही आणि प्रसन्नतापूर्ण राहील . स्वास्थ्य चांगले असल्याने सुख आणि आनंद अनुभवाल . सगे - संबंधी किंवा मित्र यांच्याकडून हार मिळतील . प्रवास आणि स्वादिष्ट भोजन दिवस आणखीच आनंदी बनवतील . आर्थिक फायदा संभवतो . श्रीगणेश म्हणतात की वैवाहिक जीवनातील उत्तम सुख आज तुम्हाला प्राप्त होईल .
मिथुन :-
श्रीगणेशजी म्हणतात की संयमशील व विचारपूर्ण वर्तन आज तुम्हाला खूप अनिष्ट गोष्टीपासून वाचवील . आपल्या बोलाचालीतून गैरसमज पैदा होतील . शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील . कुटुंबात दुःखीकष्टी वातावरण राहील . डोळ्यांना पीडा होईल . खर्च जास्त होईल . आध्यात्मिक व्यवहार मानसिक शांती देऊ शकतात .
कर्क :-
अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे पाहता आजचा आपला दिवस अतिशय रोमांचक व आनंददायी जाईल असे श्रीगणेश सांगतात . मिळकतीत वाढ होईल . व्यापाऱ्यांशी फायद्याचे सौदे होतील . मुलगा व पत्नी यांच्याकडून लाभ होईल . प्रवास , पर्यटन , तसेच विवाहोत्सुक व्यक्तींना विवाह योग आहे . उत्तम भोजन व स्त्रीसुख मिळेल .
सिंह :-
श्रीगणेश म्हणतात की तुमच्या कामात उशीरा यश मिळेल . ऑफिस किंवा घरात जबाबदाऱ्यांचे ओझे वाढेल . जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल . नवीन संबंध स्थापित करणे किंवा कामासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेणे हे टाळा असा सल्ला श्रीगणेश देतात . पित्याबरोबर मतभेद होतील . शुभ कामे ठरविण्यासाठी ही वेळ योग्य नाही .
कन्या :-
शरीरात थकवा , आळस आणि चिंता अनुभवास येतील . संतती बरोबर मतभेद होतील . त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल . ऑफिसात वरिष्ठांबरोबर आपला वाद होईल . राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल . धार्मिक कार्य किंवा धार्मिक यात्रा यासाठी पैसा खर्च होईल . भाऊबंदाकडून लाभ होण्याची शक्यता श्रीगणेश सांगतात .
तूळ :-
स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल . टाकून बोलणे किंवा खराब व्यवहार यामुळे वाद व भांडणे होतील . क्रोध , आणि कामवृत्ती यावर संयम ठेवणे आवश्यक आहे . हितशत्रू सरसावतील . अचानक धनलाभ होईल . वेळेवर जेवण न मिळणे किंवा अधिक खर्च आपल्या मनाला अस्वस्थ करतील . स्त्रीया तसेच जलाशय यापासून दूर राहणे हिताचे आहे असे श्रीगणेश सांगतात .
वृश्चिक :-
श्रीगणेशांच्या आशीर्वादाने नोकरी धंदा आणि व्यवसाय क्षेत्र यातून आज आपल्याला भरपूर लाभ होणार आहे . तसेच मित्र , थोर मंडळी , सगेसोयरे च्याकडून ही लाभ होईल . सामाजिक समारोह , पर्यटन यासारख्या ठिकाणी जाल . आपण आनंदी राहाल . मिळकत वाढेल . अविवाहितासाठी विवाह योग आहेत . कुटुंबात आनंदाचे वातावरण अनुभवाल .
धनु :-
श्रीगणेश सांगतात की , आर्थिक आणि व्यावापारिक नियोजन करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे . कार्ये यशस्वी होतील . परोपकाराची भावना आज बलवत्तर राहील . आनंदात आजचा दिवस व्यतित होईल . नोकरी व्यवसायात उन्नती आणि मानसन्मान प्राप्त होईल . गृहस्थ जीवनात आनंदी आनंद असेल .
मकर :-
श्रीगणेश म्हणतात की , आजचा आपला दिवस मिश्र फलदायी आहे . बौद्धिक कामे आणि व्यवसायात आज नवी विचार प्रणाली अमलात आणाल . लेखन आणि साहित्य क्षेत्रात तुमची सृजनात्मकता दिसेल . तरीही मनाच्या एका कोपऱ्यात अस्वस्थता जाणवेल . परिणाम असा होईल की त्यामुळे शारीरिक थकवा आणि ऊबग वाटेल . संततीच्या प्रश्नासंबंधी चिंता निर्माण होईल . उच्च पदस्थ तसेच प्रतिस्पर्धी यांच्याबरोबर चर्चेत भाग घेऊ नका , तेच हितकर होईल .
कुंभ :-
नकारात्मक विचारांनी मन हताश होईल . आज उद्वेग आणि क्रोध तुमच्या मनात जागा होईल . खर्च वाढेल . बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील . स्वास्थ्य खराब होईल . दुर्घटनेपासून स्वतःला सांभाळा . ईश्वराचे नामस्मरण व अध्यात्मिक पठण मनाला शांती देतील असे श्रीगणेश सांगतात .
मीन :-
श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा दिवस सुख शांतीत जाईल . व्यापाऱ्यांना भागीदारीसाठी उत्तम वेळ आहे . पति - पत्नी मध्ये दाम्पत्यजीवनात निकटता येईल . मित्र , स्वजन यांच्या बरोबर भेटी होतील . रोमांस वाढेल . सार्वजनिक जीवनात प्रगती होईल . उत्तम वैवाहिक सुख मिळेल .
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा