नारायण राणे दिल्लीला रवाना, भाजपा राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यालयातून फोन - दैनिक शिवस्वराज्य

नारायण राणे दिल्लीला रवाना, भाजपा राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यालयातून फोन


राकेश कोळी उपसंपादक :-

नारायण राणे उद्या भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याची खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. भाजप नेते नारायण राणे यांची केंद्रीय मंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राणेंना भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यालयातून फोन आल्याचे वृत्त सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यांना तातडीने दिल्लीला ही बोलवून घेण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे. नारायण राणे यांची राज्यातल्या राजकारणात एक वेगळी ओळख आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळयासमोर असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी भाजप कडून देण्यात येण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री पदअनुभवलेल्या राणेंना मंत्रीपद देउन मुबंई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंना एक प्रकारे ताकद देवून त्याचा उपयोग भाजप निवडणुकीसाठी करू शकते. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ७ जुलैला होण्याची शक्यता असून यामध्ये १७ ते २२ नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, चांगली  कामगिरी  नसलेल्या मंत्र्यांना  केंद्रीय  मंत्रिमंडळातून डच्चू देवून अनेक नवीन चेहऱ्यांना स्थान मिळणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना गावित आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नावं प्रामुख्याने चर्चेत आहेत. याशिवाय ज्योतिरादित्य सिंधिया, सर्वानंद सोनवाल, त्रिवेंद्र सिंह रावत, अनुप्रिया पटेल, सुशील मोदी, रिटा बहुगुणा जोशी, जफर इस्लाम आणि उत्तर प्रदेशचे सत्यदेव पचौरी यांना देखील केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads