महाराष्ट्र
जामनेर नगरपालिकेचे इंजिनियर आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या खराब कामगिरी बाबत सत्कार
जामनेर तालुका प्रतिनिधि . नितीन इंगळे
जामनेर नगरपालिकेला वारंवार रस्त्याची, गटारीची आणि रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांची तक्रार करूनसुद्धा त्यांनी कुठल्याच प्रकारची कारवाई केली नव्हती खूपदा लेखी तक्रार दिल्या खूपदा तोंडी सांगितले तरी नगरपालिकेचे इंजिनियर असेल किंवा बांधकाम विभागाचे अधिकारी असतील किंवा नगरसेवक असेल यांना काहीच फरक पडताना दिसत नव्हता म्हणूनच जामनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून गांधीगिरी मार्गाने नगरपालिकेचे इंजिनियर आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या खराब कामगिरी बाबत त्यांचा सत्कार करण्यात आला आता तरी यांना यांची जबाबदारी समजेल का हाच प्रश्न संपूर्ण जामनेर शहराच्या नागरिकांमध्ये पडलेला आहे जर जामनेर नगरपालिका प्रशासनाने या कामाची दखल नाही घेतली तर जामनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आमचे नेते संजय दादा गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची संपूर्ण जबाबदारी ही नगरपालिका प्रशासनाची राहील असा इशारा जामनेर शहराध्यक्ष पप्पू पाटील यांनी दिला आहे यावेळेस राष्ट्रवादी जिल्हा युवकउपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत दादा पाटील, युवक शहर अध्यक्ष विनोद माळी ,शहर उपाध्यक्ष इमरान शेख ,ओबीसी शहराध्यक्ष प्रभू झाल्टे , युवक सचिव अहेफाज मुल्लाजी ,शहर उपाध्यक्ष संतोष झाल्टे , अरविंद तायडे , ओबीसी शहर उपाध्यक्ष मोहन चौधरी , आझर शेख , दत्तात्रय नेरकर, रहीम बागवान , शाहिद शेख , निखिल निकम , किरण जंजाळ , जुनेद शेख , गजानन पाटील ,पवन सुरवाडे , अहमद खान ,राहुल थाटे इत्यादी उपस्थित होते
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा