महाराष्ट्र
सुधागड मधील दोन भावांची पूरग्रस्तांना अनोखी मदत
सुधागड तालुका प्रतिनिधी रवी यादव :-
सुधागड : सूधागड तालुक्यातील सीद्देश्वर बु येथील निखील शिंदे व दर्शन शिंदे या दोन भावांनी महाड येथे जाऊन फुल नाही फुलाची पाकळी म्हणून थोडी फार मदत केली. दोन्ही भाऊ कॉलेज करतात वडिल जे खाऊ ला पैसे देतात ते पैसे जमा करुन पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. दुध भाजी पाणी जेवढे जमेल तसं मदत म्हणून दिली आहे. समाज कार्याची असणारी आवड आणि आपण समाजाचे काही तरी देने लागतो, या भावनेतून दोन्ही भावांनी केलेली मदत अविस्मरणीय आहे. त्यानी केलेली या मदतीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
Previous article
Next article
Very nice 🎉
उत्तर द्याहटवा