दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२
मी... अंजली विनोद हडपी
सहभाग घेतला असून आपण माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...
स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views यावर अवलंबून आहे...
आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....
स्पर्धेची बक्षिसे :-
प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त
द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त
तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त
चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त
पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त
सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी
अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी
तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.
प्रवेश फी :- १५० रुपये फक्त
Whatsapp क्रमांक :- 8007613469
आपला नम्र
अंजली विनोद हडपी
निबंधाचा विषय : संगणकाची आजच्या काळातील भूमिका
युग संगणकाचे,
स्वप्नपूर्ताच्या सुवर्णकांचे,
जुलद माहिती संप्रेषणाचे,
हे युग मानवाच्या प्रगतीचे,
हे युग संगणकाचे.
अश्मयुगीन मानव प्रगतीच्या वाटेवर चाकाच्या साहाय्याने आला. चाकाचा शोध लागल्यावर अश्मयुगीन मानव एक प्रगतशील मानव बनला. माणसाला जसजशी प्रगती मिळत गेली, तस तसे तो अजून नवनवीन शोध घेऊ लागला. मानव हा अतिशय बुद्धिमान प्राणी आहे. मानवाने संगणक या यंत्राचा शोध लाबला व आपली भरारी अवकाशापर्यंत घेऊन गेला. संगणक आज पावलोपावली मानवाच्या गरजा पूर्ण करत आहे. संगणक हा अशा माहितीच्या भांडाराचे कोठार आहे की तेथे तुम्हाला जगातील कोणतीही माहिती सहजगत्या उपलब्ध होवू शकते. ५० वर्षापूर्वी जेव्हा कॉम्प्युटर हा शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक यंत्राचा वापर मुख्यतः आकडेमोड करण्यासाठीच केला जात असे, परंतु दिवसेंदिवस या यंत्राचा वापर अनेक प्रकारे केला जातो. या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलिकडे संगणकाचा वापर हो तर अनेक प्रकारे होवू लागला आहे. संगणक हे आज विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्वारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे. एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणाऱ्या सर्व गोष्टींची नोंद करण अशक्य आहे. आपण अगदी महत्त्वाच्या गरजांचा कि आढावा घेवू. आजच्या काळात मानव हा अतिशय प्रगतशील बनला आहे. आणि संगणकामुळे त्याचे सर्व काम हे कमी वेळात पार पाडले जाते. कोणतेही काम असले तरी ते वेगाने पार पाडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, संगणक कोणतेही काम संकंदांच्या भागात करू शकतो. अत्यंत वेगाने आणि बिनचूक करू शकतो. हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे. आपण कितीही कार्यक्षम असलो तरीही काम करण्यास कंटाळा येवू शकतो. परंतु संगणक कधीही न थकता नियमित वेगाने करतो. संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कधीही कंटाळा येत नाही. संगणक हा योग्य सूचना दिल्यास योग्य फोड करून दिल्यास कोणाच्याही देखरेखीशिवाय, आपले काम पार पाडू शकतो. आजच्या काळात संगणकाचा उपयोग आलेख, आकृत्या, रंगीत चित्र काढण्यासाठी, व्यापार, बँक कॉल सेंटर, शेअर मार्केट हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालये, तिकिट रिसर्वेशन अन्य खूप ठिकाणी उपयोग केला जातो. भौतिक, गुतागुतीच्या शास्त्रात, सैन्यदलाच्या तिन्हि दलांत बरीचशी भिस्त आता संगणकावर आहे. रोगांचे निदान लावण्यासाठी, प्रत्यक्ष शस्त्रक्रियेत अचूकता येण्यासाठी संगणकाची मदत घेतली जाते. इंजिनिअरला घराचे, इमारतीचे तसेच पुलाचे डिझाईन करायचे असेल तर संगणकाच्या मदतीने ली पूर्व नकाशा बनवू शकतो. अशी वेगवेगळी काम संगणक करतो. आजच्या काळात पावलोपावली संगणकाचा वापर मानवाला करावा लागत आहे. २०१९ मध्ये अलिल्या कोरोना महामंदीमध्ये संगणकाने मानवाला मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे. कोव्हिड- 19 महामारीमुळे लोक घरातून बाहेर जावू न शकल्याने विदयार्थ्यांच्या अभ्यासाच्या खोळंबा झाला होता. त्यात संगणकाच्या मदतीने मोबाईल फोनद्वारे विषय शिक्षण दिले जात होते. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून इंटरनेल्या साहाय्याने मुलांना शिक्षण दिले जात होते. तसेच नोकरदार वर्ग त्यांचे ऑफिस चे काम संगणकाच्या मदतीने घरबसल्या करू शकत होते. आज पर्यावरणाचा समतोल कसा आहे. तो कधी ढासळू शकतो. त्यासाठी काय उपाययोजना आखाव्यात या सगळ्यात संगणक मोठ्या प्रमाणावर मानवाच्या मदतीला येतो. मानव आज आकाशाल भरारी घेतोय या संगणकाच्या साहाय्याने. आज मानव भारतात राहून संगणकाच्या माध्यमातून देश विदेश फिरतोय. शेतकरीसुद्धा आपले शेत चांगले होण्यासाठी, अधिकाधिक चांगले उत्पन्न, प्रगतशील पद्धती उपयोगात आणण्यासाठी संगणकावरील माहितीचा उपयोग करत आहे. असा हा संगणक मानवाच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनला आहे.
संगणक आला आनंद घेवून,
काळाची गरज समजून,
आशेचा किरण घेवून,
प्रगतीचे आभाळ लेवून,
Khup sunder nibandh aahe nibanddhat manavachya pragaticha mast ullekh kelela aahe 👌👌👍👍
उत्तर द्याहटवाNice Khup chan aahe nibandh 😍😍
उत्तर द्याहटवाChan lihla aahe nibandh
उत्तर द्याहटवा