स्वदेस फाउंडेशन मार्फत जलशुद्धीकरण यंत्रणा हस्तांतरीत, नेणवली शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी - दैनिक शिवस्वराज्य

स्वदेस फाउंडेशन मार्फत जलशुद्धीकरण यंत्रणा हस्तांतरीत, नेणवली शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी



सुधागड /कोंडगाव--- राम तुपे

 सुधागड तालुक्यातील राजीप नेणवली शाळेत स्वदेस फाउंडेशन मार्फत जलशुद्धीकरण यंत्रणेचे सोमवारी (ता.12) हस्तांतर करण्यात आले. तसेच वृक्षलागवड करण्यात आले.
     जि.प.शाळा-नेणवली येथे गेल्या दोन वर्षात गाव सक्षमीकरण अंतर्गत शाळा नेणवली येथे ग्रंथालय, स्वछतागृह, प्रयोग साहित्य, जलशुद्धीकरण आदी योजना व भौतिक सुविधा कार्यान्वित झाल्या आहेत. असे शिक्षक राजेंद्र अंबिके यांनी सांगितले.
    यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय धानुधरे, उपसरपंच शांताराम कोंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज कोंडे, स्वदेस फाउंडेशनचे समन्वयक दिपक मेनन, अभियंता मुकेश रजाले मुख्याध्यापक संतोष हारपाल, शिक्षक राजेंद्र अंबिके, गणपत वरघडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

     स्वदेस फाउंडेशन गाव व शाळा व्यवस्थापन समिती सक्षम होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी संपूर्ण समिती प्रशिक्षित होण्यासाठी सर्वाना स्वयंपूर्ण व समृद्ध केले जाईल. 
दिपक मेनन, शिक्षण व युवा समन्वयक, स्वदेस फाउंडेशन
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads