मोहोळ पोलीसांची अनगर येथील गांजाच्या शेतीवर धडाकेबाज कारवाईत 66 किलो गांजा हस्तगत - दैनिक शिवस्वराज्य

मोहोळ पोलीसांची अनगर येथील गांजाच्या शेतीवर धडाकेबाज कारवाईत 66 किलो गांजा हस्तगत



सलीम शेख मंगळवेढा तालुका प्रतिनिधी :-

मोहोळ  अनगर येथील गाव शिवारात शेतामध्ये गांजाची लागवड करून विक्री होत असल्याची माहिती मोहोळ पोलिसांना मिळाली त्यांनी या गांजाच्या शेतीवर धाड  टाकून 66 किलो गांजा व 65 झाडे हनुमंत शिंदे (वय 55 )यांच्या शेतात हस्तगत केली या गांजाची बाजारातील किंमत 6 लाख 85 हजार 500 रुपये इतकी आहे ही कारवाई 12 जुलै सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक अशोक सायकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंणगे, सहाय्यक फौजदार चंद्रकांत कदम ,युसुफ शेख, कॉन्स्टेबल गणेश दळवी ,पांडुरंग जगताप, मंगेश बोधले, रवींद्र बाबर, हरीश थोरात यांच्या पथकाने केली.

सदर ठिकाणी पंचनामा करण्यासाठी तहसीलदार जीवन बनसोडे पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंणगे व सरकारी पंच उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads