समाजासमोर एक आदर्श निर्माण केल्याबद्दल एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री महादेव कोगनुरे यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने "विषेश सामाजिक सन्मान" - दैनिक शिवस्वराज्य

समाजासमोर एक आदर्श निर्माण केल्याबद्दल एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री महादेव कोगनुरे यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने "विषेश सामाजिक सन्मान"



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-

सोलापूर दि. ४ जुलै : एम के फाऊंडेशन चे संस्थापक तथा सागर सिमेंट चे मुख्य व्यवस्थापक श्री महादेव कोगनुरे  यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांचा "विशेष सामाजिक सन्मान" प्रदान

कोरोना काळात समाजासाठी झोकून देऊन काम करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडून समाजासमोर एक आदर्श निर्माण केल्याबद्दल एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री महादेव कोगनुरे  यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने "विषेश सामाजिक सन्मान" केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार मा. श्री. रामदास आठवले  यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्रजी फडणवीस  तसेच आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री. राजेश टोपे  यांच्या प्रमुख उपस्थितीत "सन्मान देवदूतांचा" या विशेष सोहळ्यात यशवंतराव चव्हाण सेंटर मुबई येथे प्रदान करण्यात आला.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads