राजकीय
आज होटगी पंचायत समिती गणातील होटगी गावामध्ये शिवसेना शिवसंपर्क अभियान
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनीधी :-
सोलापूर (द.सोलापूर) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे . आज होटगी पंचायत समिती गणातील होटगी गावामध्ये शिवसेना शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे या अभियानामार्फत जास्तीत जास्त घरापर्यंत शिवसेना पोहचलण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी , पदाधिकाऱ्यांनी काम करावे असे आव्हान शिवसेनाउपजिल्हाप्रमुख अमर दादा पाटील यांनी केले .या अभियानामार्फत मुख्यमंत्र्यांचे कार्य घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी काम करावे. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये दक्षिण पंचायत समितीवर भगवा पळवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आव्हान अमर दादा यांनी शिवसैनिकांना केले
तसेच या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना तालुका समन्वयक गंगाराम चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक निर्माण झाला पाहिजे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची सरकार म्हणून केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावे. महाराष्ट्रातील कोरोना काळातील परिस्थिती हाताळण्यात उद्धवजी ठाकरे कसे यशस्वी झाले हे लोकांपर्यंत पोहोचवले आहे, तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेने स्वतःच्या जोरावर यशस्वी होण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लावावे . तसेच शिवसेना पदाधिकार्यांनी लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपले जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे साहेब, अमर पाटील , तालुकाप्रमुख यांच्यामार्फतशासनाकडे पाठपुरावा करावे असे आवाहन चौगुले यांनी केले.
होटगी येथे शिवसेना शिवसंपर्क अभियान संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद सदस्य व उपजिल्हाप्रमुख अमर दादा पाटील , शिवसेना तालुका समन्वयक गंगाराम चौगुले तालुकाप्रमुख योगीराज पाटील माझी मार्केट कमिटी संचालक राजेंद्र गंगदे, प्रगतशील शेतकरी सुभाष पाटील, नुतन ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ गंगदे, मल्लू पटणे, शिवसेना विभागप्रमुख विश्वनाथ गंगदे, शाखाप्रमुख लक्ष्मण चौगुले तसेच समस्त शिवसैनिक उपस्थित होते
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा