महाराष्ट्र
सागर सिमेंटच्या वतीने मंद्रुप येथे प्राथमिक शाळेतील गरजू मुलांना वह्यांचे वाटप
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी :-
सोलापूर (मंदूप) : सागर सिमेंटच्या वतीने आज दि.२२ मंद्रुप येथे प्राथमिक शाळेतील गरजू अश्या निरागस मुलांना माझे मार्गदर्शक, मंद्रुप मठाचे मठाधिश पूज्य रेणुक शिवाचार्य महास्वामी यांच्या अमृतहस्ते ५००० वह्यांचा वाटप करण्यात आल्या.
कोविडमुळे सामान्य माणसाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे, कुटुंबाची घडी सावरणाऱ्या सामान्य वर्गातील मुलांना शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी सागर सिमेंटच्या वतीने ५१००० वह्या वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
आजच्या ह्या कार्यक्रमाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होते.प्रत्येकांनी आपल्या मनोगतातून त्याच्या कार्याचा गौरव केला.
मंद्रुप महास्वामीनी महादेव कोगनुरे यांना देवदूत वैगरे अलंकारिक शब्दाने कौतूक केले. प्रत्येक शिष्याला गुरूंच्या कौतुकाने आनंद वाटतं. अप्पाजींच्या कौतुकाला महादेव कोगनुरे म्हणाले मी आदर करतो पण मी देवदूत वगैरे नाही, मला बालवयात ज्या यातना सहन कराव्या लागल्या त्या इतरांच्या वाट्याला येऊ नयेत या भावनेतून थोडीफार समाजसेवा करत आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य विद्दुलताताई कोरे,पोलीस निरीक्षक नितीन थिटे साहेब सरपंच खंदारे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते अमोल कारंडेजी,गणेश ट्रेडर्सचे गणेश कट्टीमनी मालक आदी उपस्थित होते.
Previous article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा