महाराष्ट्र
बोरेगाव येथे एक पद एक वृक्ष अभियान संपन्न
नागाराज गाढवे अक्कलकोट तालुका प्रतिनिधी :-
अक्कलकोट दि.27 :- अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथे महिला बालविकास विभाग व अंगणवाडी व बोरेगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या एक पद एक वृक्ष अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना सरपंच उमाकांत गाढवे यांनी सर्वत्र प्रदूषण वाढल्याने निसर्गाचा समतोल बिघडला आहे. शासनाचा वृक्षारोपण अभियानामुळे झाडांचे संवर्धन होणार आहे. ग्रामीण भागात प्रत्येकाने एक तरी झाड लावणे गरजेचे आहे, असे म्हणाले याप्रसंगी वड चिंच कडुलिंब अशोक ची झाडे लावण्यात आले तसेच झाडांच्या संरक्षणासाठी नीलकंठ कंकमारे यांच्याकडून झाडांना लोखंडी गार्ड दिले. याप्रसंगी सहाय्यक बाल विकास अधिकारी शीतल बुलबुले अंगणवाडी पर्यवेक्षिका अश्विनी चटमुटगे, स्वरांगी गायकवाड, सेविका शमशाद जमादार, पुष्पा माने, वनमाला बनसोडे, लक्ष्मण शिवशेट्टी, मुतणा बिराजदार, महेश उस्तूरगे, सिद्धाराम बणजगोळे, भुताळी पुजारी, श्रीशैल पाटील, गौरीशंकर खांडेकर, लगमणा जडगे, परमेश्वर शिंदे आदी. उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा