खोपोली स्मशानभूमी मागील लहान मुलांना दफन करणार्‍या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता बाबत क्रांतीनंतरमधील तरुणांचा संताप, नगरपालिकेने तात्काळ लक्ष देण्याची मागणी - दैनिक शिवस्वराज्य

खोपोली स्मशानभूमी मागील लहान मुलांना दफन करणार्‍या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता बाबत क्रांतीनंतरमधील तरुणांचा संताप, नगरपालिकेने तात्काळ लक्ष देण्याची मागणी



सुधागड /कोंडगाव--- राम तुपे

खोपोली - नगरपरिषदेचे लक्ष खोपोली स्मशानभूमी कडे योग्य प्रकारे आहे... परंतु त्याच स्मशानभूमी मागे लहान मुलांची दफनभूमी आहे तिकडे मात्र पालिकेचे लक्ष नसल्याचे दिसून आले आहे.. कालच खोपोली शहरातील क्रांतीनंतर मधील दोन लहान मुले नाल्यातून नदीमध्ये वाहत गेली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याने खूप प्रयत्नानंतर आज त्यातील मुलगी मिळाली असून तिला दफन करण्यासाठी खालची खोपोली येथील स्मशानभूमी मागे असलेल्या लहान मुलांची दफनभूमी या ठिकाणी दफन करण्यासाठी नेले असता.. सदरील ठीकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसून आले.. यावेळी उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला परंतु क्रांतीनंतर मधील तरुणांनी एकत्र येत सदरील परिसर स्वच्छ करून लहान मुलीला योग्य प्रकारे दफन केले... सदरील प्रकार पाहता खोपोली नगरपालिकेने तात्काळ साफसफाई करून घेण्याची गरज असल्याची मागणी उपस्थित तरुणांनी केली आहे...

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads