महाराष्ट्र
पोलीस निरीक्षकांच्या वाढदिनी लायन्स क्लबकडून वृक्षरोपण
राकेश कोळी उपसंपादक :-
खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ खेड स्टार तर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ऑक्सिजन निर्मिती होण्यासाठी वाढदिवसाचे औचित्य साधून पोलीस स्थानकाच्या आवारात निशा जाधव मॅडमच्या हस्ते पिंपळाच्या रोपट्याची लागवड करण्यात आली. कोरोना च्या काळात पोलिस स्थानकात येणाऱ्या हजारो लाखो लोकांना ऑक्सिजन मिळावा या हेतूने या रोपट्याची लागवड करण्यात आली. यावेळी लायन्स क्लब अध्यक्षा ला. संपदा गुजराती, झोन चेअरमन ला. विनया चिखले खजिनदार ला. अनुराधा तुरबाडकर, ला. स्नेहल गांधी, ला. उमा गुजराथी, ला. प्रीती दरेकर ला. नेत्रा पाटणे आदी उपस्थित होत्या.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा