नगरसेवक-मुख्यमंत्री-केंद्रीय मंत्री नारायण राणेंची कारकीर्द - दैनिक शिवस्वराज्य

नगरसेवक-मुख्यमंत्री-केंद्रीय मंत्री नारायण राणेंची कारकीर्द


राकेश कोळी उपसंपादक :-

शिवसेना, कॉंग्रेस आणि स्वाभिमानी नंतर माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे भाजपमध्ये स्थायिक झाले.  त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळेल हे निश्चित होते.  महाराष्ट्रातील नारायण राणे यांनी बुधवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.  शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री ते आता केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री असलेले नारायण राणे यांचे करिअर.

१९९१ साली महाराष्ट्रात झालेल्या राजकीय नाट्यानंतर छगन भुजबळांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. यामुळे  विधिमंडळातल्या विरोधीपक्ष नेतेपदाची संधी आमदार नारायण राणेंकडे आली. यानंतर शिवसेना-भाजपच्या  युती सरकारमध्ये राणे १९९६ ला महसूल मंत्रीपण झाले.  १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ या काळात राणेंना मुख्यमंत्री पदावर बसविण्यात आले. १९९९ मध्ये पुन्हा राज्यात सत्तांतर झाल्याने काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आले. यावेळी नारायण राणे पुन्हा विरोधी पक्षनेते झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी २००३ साली महाबळेश्वरमध्ये झालेल्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंची शिवसेना कार्याध्यक्षपदी निवड केली. यावेळी मात्र नारायण राणे दुखावले गेल्याने २००४ साली शिवसेना सोडत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी झालेल्या मालवण विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून विक्रमी मताने निवडून आले. यावेळी त्यांची आघाडी सरकारच्या महसूलमंत्री पदी वर्णी लागली.

२००९ मध्ये आघाडी सरकारमध्ये नारायण राणें
कडे उद्योग खातं देण्यात आलं. मात्र नारायण राणेंना मुख्यमंत्रिपदाची आपेक्षा असल्यामुळे ते काँग्रसमध्येही नाराज झाले आणि काँग्रेस सोडली. यावेळी मात्र त्यांनी २०१८ मध्ये स्वतःचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. यावेळेस नारायण राणे भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर गेले आणि राणेंचा स्वाभिमानी पक्ष सुद्धा ऑक्टोबर २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत  भाजपमध्ये विलीन झाला. 

नारायण राणेंची राजकीय कारकीर्द 

बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे नारायण राणेला ओळख मिळाल्याचे नुकतेच त्यांनी स्पष्ट केले होते.

1968 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी शिवसेनेत प्रवेश

1985 ते 1990 या कालावधीत शिवसेना नगरसेवक व नंतर BEST (बेस्ट) चे अध्यक्ष बनले.

1990-95 या कालखंडात पहिल्यांदा आमदार व विधान परिषदेचे सदस्यही बनले.

1996-99 च्या सेना भाजपच्या मंत्रीमंडळात महसूलमंत्री झाले.

1999 ला बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने मुख्यमंत्री झाले.

2005 मध्ये उद्धव ठाकरे सोबत झालेल्या मतभेदानंतर 3 जुलै 2005 ला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला व ते पुन्हा महसूलमंत्री झाले.

2007 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पदासाठी टक्कर दिली.

2009 साली महाराष्ट्राचे उद्योग मंत्री बनले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुलगा नीलेश राणेंच्या पराभवानंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

2017 साली काँग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला.

2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष ही भाजपमध्ये विलीन केला.

2021 मध्ये 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads