महाराष्ट्र
बकरी ईदच्या दिवशी गोंदवले बुद्रुक, सातारा येथे रक्तदान शिबिर
प्रशांत आडसर बदलापूर प्रतिनिधी :-
बकरी ईद च्या निमित्ताने दरवर्षी गोंदवले बुद्रुक मधील मुस्लिम समाजाने सुरू ठेवलेला रक्तदानाचा उपक्रम स्तुत्य असून या माध्यमातून सामाईक सलोखा राखण्यास मोठी चालना मिळत असल्याचे मत दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी व्यक्त केले.
बकरी ईद च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमात श्री भुजबळ बोलत होते.यावेळी राजकुमार भुजबळ,प स चे उपसभापती तानाजीराव कट्टे,सरपंच जयप्रकाश कट्टे,उपसरपंच संजय माने आदी मान्यवरांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष डॉ समीर तांबोळी,जेष्ठ सदस्य शेखहमीद तांबोळी,डॉ सौ समीना तांबोळी,माजी ग्रामपंचायत सदस्य सौ हाफीजा तांबोळी मायणी मेडिकल कॉलेज रक्तपेढीचे डॉ रायबोले व त्यांचे सहकारी उपस्थित होते.या शिबिरात सत्तावीस जणांनी रक्तदान केले.
राजकुमार भुजबळ म्हणाले,मुस्लिम समाज हा सर्वत्र मागासलेला व परंपरेला जखडून राहिलेला दिसतो.परंतु गोंदवल्यात मात्र आधुनिक विचारधारा घेऊन समाजोन्नती करत असलेला समाज आहे.या विचारधारेची सर्वानी प्रेरणा घ्यावी.
उपसरपंच संजय माने म्हणाले, गोंदवल्यातील मुस्लिम समाजाचा जाती पातीला छेद देत गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कामात हिरीरीने सहभाग राहिला आहे.ईद निमित्त रक्तदान उपक्रमातुन रक्ताचे नाते जोडले जात असल्याने हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू ठेवावा.त्यासाठी आम्ही सर्वस्वी सहकार्य करू.
शेखहमीद तांबोळी म्हणाले,येथील मुस्लिम समाज नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होत असून समाजातील युवकांनी हा वारसा अखंडितपणे सुरू ठेवावा.
यावेळी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अमृत पाटील,पोलीस पाटील सौ आशा भोसले,ग्रामपंचायत सदस्य पंकज पाटील,तानाजी शिंगाडे,गुरुदत्त कुलकर्णी,प्रवीण कट्टे,सौ.अनिता रणपिसे,संदीप फडतरे,अशपाक तांबोळी,जावेद तांबोळी,असीम तांबोळी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अफशन तांबोळी हिने केले.सोहेल तांबोळी याने प्रास्ताविक केले तर कु.सलोनी तांबोळी हिने आभार मानले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा