महाराष्ट्र
मुक्या प्राण्यांसाठी धाऊन आली एनिमल मेंटर टीम
सुधागड तालुका प्रतिनिधी रवी यादव :
सुधागड : सूधागड तालुक्यातील मौजे विठ्ठलवाडी येथे एनिमल मेंटर ही सस्था कार्यरत आहे, ही संस्था मुक्या प्राण्यांसाठी काम करते. कोलाडपासुन फक्त १० किलोमीटर अंतरावर आहे. या संस्थेने महाड येथे जाऊन महापुरात जखमी झालेल्या गाई, कुत्रे, बैल, म्हैस यांचावार जाऊन उपचार केले. महापुरात अडकलेले प्राणी भुकेने व्याकुळ झाले होते. त्यांना पोटभर खाऊ घातले. तसेच त्यांना आलेला थकवा घालवण्यासाठी त्यानंचावर योग्य पध्दतीने उपचार केले. नेहमी कोणतेही संकट आले की मुक्या प्राण्यांकडे दुर्लक्ष होते. पण एनिमल मेंटर ही संस्था नेहमी धावून जाते. या सगळयासाठी गणेश नायक व त्यांची टिम अगदी मनापासुन काम करतात.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा