लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल,जामनेर येथे दहा दिवशीय शालेय गणेश उत्सवासाची सुरवात - दैनिक शिवस्वराज्य

लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल,जामनेर येथे दहा दिवशीय शालेय गणेश उत्सवासाची सुरवात



 जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे                        10 सप्टेंबर 2021,शुक्रवार- लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल,जामनेर येथे दहा दिवशीय गणेश उत्सवाला आज पासुन उत्साहात सुरवात झाली.
शाळेत दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या  उत्साहात साजरा केला जात असून.शाळेत पर्यावरण पूरक शाळू मातीपासून बनवलेल्या श्री मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते.                                येथील आरास आणि देखावा सुध्दा पर्यावरणस्नेही असतो. शाळेतील गणेशोत्सवाचे तेरावे वर्षी सुद्धा गणपती बाप्पाला थाटामाठात बसवले आहे.
या वेळी झालेल्या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक राहुल मिश्रा, यांनी संस्थेचे सचिव अभय बोहरा, यांच्या हस्ते सपत्नीक,शाश्रोक्त पद्धतीने मंगल मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापणा केली.                              यावेळी शाळेचे मुख्याध्यापक धनंजय सिंग, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मोरे, अध्यक्ष हेमंत ललवाणी, सचिव अभय बोहरा,निर्देशक राहुल साबद्र,उपसचिव दिपक पाटील, विनोद बुळे तसेच सर्व शिक्षक व्रुंद उपस्तीत होते.    श्रीमुर्ती च्या प्राणप्रतिष्ठापणे नंतर गणेशाची आरती झाली. त्या नंतर विद्यार्थ्यानी एक नाटिका सादर केली.व गणेश भक्तीपर गीत गायन केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी भक्ती देवरे या विद्यार्थीनीने केले.व अध्यक्षीय भाषणात अभय बोहरा यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads