वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २१ गावात 'एक गाव एक गणपती' : सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांची माहिती - दैनिक शिवस्वराज्य

वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २१ गावात 'एक गाव एक गणपती' : सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांची माहिती


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
  सोलापूर : वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील 35 गावामध्ये बैठक घेऊन सोलापूर पोलीस अधीक्षक मा तेजस्वी सातपुते यांनी एक गाव एक गणपती बाबत प्रयन्त करणेबाबत सूचना दिलेल्या नुसार अक्कलकोट विभागाचे उपअधीक्षक डॉ संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले,गोपनीय अंमलदार मंथन सुळे,पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील,सरपंच व गावातील गणेश मंडळाचे अध्यक्ष यांच्या संयुक्त प्रयत्नातुन पोलीस ठाणे हद्दीतील 21 गावे एक गाव एक गणपती झाली आहेत. यामध्ये  1) रामपूर,2) दिंडूर,3) वडगाव, 4)तीर्थ, 5) इंगळगी,6) शिरवळ, 7)शिंगडगाव, 8)आचेगाव, 9)आलेगाव, 10)कणबस, 11)तिल्हेहाळ, 12) दर्गनहळ्ळी, 13)शिरपनहळ्ळी, 14) यत्नाल, 15)हनमगाव, 16) गुरदेहळी, 17)सिंदखेड,18)हिपळे, 19)मद्रे, 20)बंकलगी 21) कर्देहळ्ळी या २१ गावांनी सहभाग नोंदविला आहे.
      तसेच वळसंग पोलीस ठाणे हद्दीत एकूण 85 सार्वजनिक मंडळे असून हे बहुतांश मंडळ व त्यांचे अध्यक्ष यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या माझे गाव सुरक्षित गाव या संकल्पनेनुसार आतापर्यंत वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 35 गावात 39 ठिकाणी सायरन बसविण्यात आले आहे .ही यंत्रणा पोलीस,पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दल याना रात्र गस्त करतेवेळी उपयुक्त ठरत आहे.
         अशा पद्धतीने वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या माझे गाव सुरक्षित गाव व गाव तेथे सीसीटीव्ही  या संकल्पनेत उस्फुर्तपणे सहभाग घेणाऱ्या संबंधित गावातील गणेश तरुण मंडळास विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
          तसेच 2021 चा गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी वळसंग पोलीस ठाण्याकडून 300  इस्मानवर CRPC कलम 107,110,144(2) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56,55 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली असून 46 इसम हे पुढील 10 दिवसकरिता हद्दपार करण्यात येणार आहेत अशी माहिती वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads