महाराष्ट्र
निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्यांची भाजप दखल घेतो: प्रा. मोहन वनखंडे
सलीम शेख मंगळवेढा तालुका प्रतिनिधी
सोलापूर :- भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघ सरचिटणीस प्रा मोहन वनखंडे हे सोलापूर येथे पक्षकामासाठी आले असता हॉटेल बालाजी सरोवर येथे त्यांचा सत्कार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. चांगदेव कांबळे व सोलापूर शहर अध्यक्ष बाबुराव संगेपान यांच्या वतीने त्यांचे सत्कार करण्यात आले. त्यांच्या समवेत जिल्हा संघटन सरचिटणीस अनिल कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी वाघमारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विजय घाडगे व उत्तर सोलापूर चे ता.अध्यक्ष कैलास कांबळे तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.वनखंडे म्हणाले की, मी २८ वर्षे भाजप च काम निरपेक्ष भावनेने करत आहे त्यामुळे भाजपा ने मला प्रदेश पातळीवर संधी दिली. जो पदाधिकारी व कार्यकर्ता पक्षाचे काम निस्वार्थपणे करतो त्याची वरिष्ठ पातळीवर नक्कीच दखल घेतली जाते. तसेच त्यांनी पक्ष संघटन मजबूत करणे व इतर गोष्टीविषयी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली .
अनुसूचित जाती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष प्रा डॉ. चांगदेव कांबळे म्हणाले की जनसंघ पार्टी चा प्रवास शाम मुखर्जी ते दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारातून निर्माण झालेल्या पक्षाने अटल बिहारी वाजपेयी सारखे लोकप्रिय पंतप्रधान देशाला दिले. पक्षाच्या विविध कार्याचा आढावा त्यांनी आपल्या भाषणातून घेतला.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा