रेनगर सोसायटी प्रकल्पाचा कालबद्ध आराखडा करा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना सोसायटीच्या बांधकामास दिली भेट - दैनिक शिवस्वराज्य

रेनगर सोसायटी प्रकल्पाचा कालबद्ध आराखडा करा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना सोसायटीच्या बांधकामास दिली भेट


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर, दि.११: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे रेनगर सोसायटीमध्ये ३० हजार घरकुलांचा प्रकल्प उभा राहत आहे. पहिल्या टप्प्यात १००२० घरकुले उभी राहत असून या प्रकल्पाचा कालबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित यंत्रणेला आज दिल्या.

नियोजन भवन येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि रे नगर सोसायटी यांच्या कामाचा आढावा बैठकीत श्री शंभरकर बोलत होते. यावेळी माजी आमदार नरसय्या आडम, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, सहायक जिल्हाधिकारी तथा दक्षिणच्या प्रांताधिकारी मनीषा आव्हाळे, भारतीय राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री माशाळे, तहसीलदार अमोल कुंभार, म्हाडाचे उपअभियंता श्री.अटकले, रेनगर सोसायटीचे सचिव आदी उपस्थित होते.

श्री. शंभरकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सादर होणाऱ्या आराखड्याला  मंजुरीसाठी विलंब होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध तयारी करा. प्रत्येक टप्प्यास लागणार कालबद्ध कार्यक्रम तयार करून सादर करा. रेनगर सोसायटीने आवश्यक ती मदत करावी. महानगरपालिकेला अभिप्रायासाठी त्वरित पत्रव्यवहार करावा, अशा सूचना त्यांनी केल्या.
 
बैठकीनंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी प्रकल्पाची केली पाहणी

बैठकीनंतर जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी कुंभारी विडीघरकुल रे नगर येथील प्रकल्पाची पाहणी केली. त्यांनी बांधकाम कामाच्या प्रगतीचा अहवाल घेतला. प्रत्येक घरकूल बांधकामच्या प्रत्येक टप्यावरील वेगवेगळ्या कामाच्या ठिकाणी भेटी देवून पाहणी केली. मनुष्यबळ आणि साधन सामग्री वाढवण्याबाबत सोसायटीस त्यांनी सूचना दिल्या. विडी कामगार यांच्या घराच्या दृष्टीने भविष्यात कोणतीही समस्या उद्भभवू नये, बांधकाम दर्जेदार होण्यासाठी सर्व यंत्रणेने काळजी घेण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads