महाराष्ट्र
मंद्रूप येथे गांधी भवन येथे ग्रामसभा संपन्न, ग्रामपंचायत सदस्य व अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ...!
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (मंदूप)दि. २८ ऑक्टोबर : कोरोना मुळे परवानगी नसल्याने गेली दोन वर्षापासून ग्रामसभा घेण्यात आली नाही. सद्या कोरोनाची लाट ओसरली असल्याचे दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मंद्रूप ग्रामपंचायतीच्या वतीने गांधी भवन येथे मंद्रूपचे सरपंच कलावती खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थित पार पडली. दोन वर्षानंतर घेतलेल्या या ग्रामसभेत फक्त सहा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तर दुसरीकडे मंद्रूपचे पोलीस, MSEB चे अधिकारी, तलाठी व सिटी सर्वेचे अधिकाऱ्यांनी मात्र या ग्रामसभेला पाठ फिरवल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत असल्याचे दिसून आले. आज घेतलेल्या या ग्रामसभेत विविध प्रश्नांवर चर्चा करुन केलेल्या विविध विकास कामांची माहिती मंद्रूपचे ग्रामसेवक नागेश जोडमोठे यांनी दिली व या घेतलेल्या ग्रामसभेत माजी वसुंधरा अभियानांतर्गत हरीत शपत घेण्यात आली. कोरोना मध्ये ग्रामसेवक नागेश जोडमोठे यांनी गावात मोठ्या प्रमाणात विविध विकास कामे केल्यामुळे ग्रामसभेत ठराव मंजूर करून ग्रामसेवक जोडमोठे यांचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच कलावती खंदारे, ग्रामसेवक नागेश जोडमोठे, उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, ग्रामपंचायत सदस्य व मोजकेच ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा