सामाजिक
मंद्रूपचे सामाजिक कार्यकर्त आर.के. कन्स्ट्रक्शनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी स्वःखर्चाने जिल्हा परिषद शाळेत बोअरवेल मारून केली पाण्याची व्यवस्था..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (मंदूप) : मंद्रूप येथील जिल्हा परिषद ऊर्दु प्राथमिक शाळेत काल शौचालय दुरूस्तीचे व दोन नवीन खोल्यांचे भुमिपुजनाचे कार्यक्रम संपन्न झाले.. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या विद्युलता कोरे, ग्रामसेवक नागेश जोडमोठे, माजी सरपंच अनिता कोरे, उपसरपंच अल्लाउद्दीन शेख व आर.के. कन्स्ट्रक्शनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड उपस्थित होते.. नवीन शौचालयाचे उद्घाटन संपन्न झाल्यानंतर आर. के. कन्स्ट्रक्शनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी मुख्याध्यापक जहाआरा तांबोळी यांना पाण्याची चौकशी केली असता, मुख्याध्यापक तांबोळी यांनी सर्व शिक्षक पैसे देऊन पाणी बाहेरून मागवून घेत असल्याचे सांगितले. नवीन शौचालयाचे काम झाले पण पाणी नसल्याचे समजताच आर.के. कन्स्ट्रक्शनचे संस्थापक अध्यक्ष यांनी ताबडतोब स्वःखर्चाने बोअरवेलची गाडी बोलावून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात बोअर मारण्यास सांगितले.. सुदैवाने त्या ठिकाणी दोन इंच पाणीही लागले. शाळेत पाण्याची सुविधा झाल्याबद्दल सर्व शिक्षक व मुख्याध्यापक तांबोळी यांनी आर. के. कन्स्ट्रक्शनचे मोतीलाल राठोड यांचे आभार मानले. राठोड यांनी शाळेत पाण्याची व्यवस्था केल्याचे समजताच सर्वच स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.आर. के. कन्स्ट्रक्शनचे मोतीलाल राठोड हे नेहमी मंद्रूप परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात पण आज केलेले कार्य हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांच्या पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी केल्याने अविस्मरणीय असल्याचे दिसत आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा