शेतकऱ्यांना पहिली उचल प्रति टन 2 हजार रुपयेप्रमाणे तातडीने देण्याची लोकमंगलने दिली हमी ; किसान सभेचे तालुकाध्यक्ष डाॅ. शिवानंद झळके यांची माहिती - दैनिक शिवस्वराज्य

शेतकऱ्यांना पहिली उचल प्रति टन 2 हजार रुपयेप्रमाणे तातडीने देण्याची लोकमंगलने दिली हमी ; किसान सभेचे तालुकाध्यक्ष डाॅ. शिवानंद झळके यांची माहिती




समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (मंद्रूप) : यंदाच्या हंगामासाठी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिली उचल प्रति टन
दोन हजार रुपयेप्रमाणे तातडीने देण्याची हमी भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्याने घेतली आहे.आणखी ४०० रुपये प्रतीटन दुसरी उचल देण्याची मागणी संघटनेने केली असल्याची माहिती किसान सभेचे तालुकाध्यक्ष शिवानंद झळके यांनी दिली.

एफआरपीपेक्षा वाढीव रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी लोकमंगल कारखाना बंद पाडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेने संयुक्तरित्या दिला होता.यासंदर्भात समाधानकारक चर्चेअंती शुक्रवारी होणारे आंदोलन स्थगित केल्याची माहिती किसान सभेचे तालुकाध्यक्ष शिवानंद झळके यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads