सामाजिक
दक्षिण सोलापूर मधील नांदणी येथील तीर्थक्षेत्र श्री नागम्मा देवी परिसर सुधारणा व येथे पर्यटनास चालना देणे या संदर्भात बैठक संपन्न.....
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूर मधील नांदणी येथील तीर्थक्षेत्र श्री नागम्मा देवी परिसर सुधारणा व येथे पर्यटनास चालना देणे या संदर्भात बैठक पार पडली. सोलापूर जिल्हा वन विभाग अधिकारी लक्ष्मण आवारे तसेच सोशल फाउंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीस गावातील नागरिक व तरुण वर्ग यांची उत्स्फूर्त उपस्थिती मिळाली. सदर बैठकीमध्ये नागम्मा देवी जवळील तलाव सुशोभिकरण करणे, वृक्षारोपण प्रमाण वाढविणे, लोकसहभागातून कामाची सुरुवात करणे, कामाच्या पाठपुरावा करण्यासाठी समिती स्थापन करणे, इत्यादी संबंधी चर्चा करण्यात आली. याचबरोबर आगामी काळातील उपक्रमांचे नियोजन करण्याविषयी चर्चा करण्यात आली. गार्डनिंग, धोबी घाट, पाणवठे, पक्षी निरीक्षण, बोटिंग, झुला, रफलिंग, तुळशी वृंदावन, बचत गट उत्पादन, हॉटेल, चादर व टॉवेल विक्री केंद्र, खादी ग्रामोद्योग व्यवसाय, मधमाशी पालन व मध विक्री, स्थळाची प्रसिद्धी व मार्केटिंग, वाचनालय अशा अनेक मुद्द्यांचा यात समावेश होता. बैठकीमध्ये गावातील नागरिकांनी देखील आपली मते मांडली, बदल सुचविले गेले, सूचना केल्या. या सर्व बाबींचा विचार करून रचनात्मक पद्धतीने आराखडा तयार करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. यावेळी सरपंच शिवानंद बंडे निवृत्त पोलिस अधिकारी सुरवसे , गौरीशंकर मेंडगुदले, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा