सामाजिक
मित्र नगर,शेळगी येथे मदिना युवक संघटनेच्या वतीने शेर-ए-हिन्द शहिद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन...
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (शेळगी) : शेर-ए-हिन्द शहिद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त मदिना युवक संघटना संपर्क कार्यालयात मित्र नगर शेळगी येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग क्रमांक दोन चे नगरसेवक शंकर शिंदे , सोलापूर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभाग सरचिटणीस अकबर शेख ,सादिक भाई हुंडेकरी, वजीर मुजावर, पत्रकार अल्ताफ शेख, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुस्ताक पटेल, ताहेर बागवान, T.S. ग्रुप चे अध्यक्ष भाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अल्ताफ शेख पत्रकार यांनी केले .व या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नबीलाल बागवान, टिपू शेख ,बाबा मुल्ला, शफिक मुजावर, सुलतान शेख, आमीन मुल्ला, जुनेद पटेल, सादिक ताडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा