गुंजेगाव ता.द. सोलापूर येथील संबोधी नगर मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा - दैनिक शिवस्वराज्य

गुंजेगाव ता.द. सोलापूर येथील संबोधी नगर मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा




समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
 सोलापूर (मंद्रूप) : २६ नोंहेबर  रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथील संबोधी नगर येथे  संविधान दिन अत्यंत साध्या पद्धतीने व कोरोना संसर्गाचा काटोकोर पालन करीत साजरा करण्यात आला.
या संविधान दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी व समाजिक एकोपा निर्माण होण्यासाठी म्हणून सध्या लोकप्रियतेचा शिखरावर  असलेला जय भीम चित्रपट यावेळी दाखवण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कंदलगाव चे सुपुत्र सोल्जर अरुणकुमार उडाणशिव हे उपस्थित होते.व या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गुंजेगावचे सुपुत्र व प्रगतशील बागायतदार मेजर रामचंद्र गोसावी हे होते याचं बरोबर मंचावर गुंजेगावचे गावचे सुपुत्र गावडेवाडी येथे प्राथमिक शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असलेले आकांत भडकुंभे हे मान्यवर उपस्थित होते.
तसेच भारतीय संस्कृती चे प्रतिक म्हणुन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मंच्यावरील सर्व मान्यवरांचे यथोचित सत्कार संबोधी नगर मंडळाच्या वतीने करण्यात आले.
यावेळेस या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले मेजर रामचंद्र गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याच बरोबर प्राथमिक शिक्षक आकांत भडकुंबे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
                या कार्यक्रमास वरील मान्यवरांसह सानिया कंट्रक्शन चे मालक मोहन भडकुंबे,ऐडवकेट निका आठवले, गावचे उपसरपंच तुकाराम भडकुंबे, माजी उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य किरण आठवले,आकांत आठवले सर, संतोष भडकुंबे,नागेश थोरात,लखन भडकुंबे, सौदागर आठवले, नागेश भडकुंबे,विकास भडकुंबे बिल्डर,युवा नेते सत्यवान भडकुंबे उपस्थित होते.                                    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भडकुंबे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकांत आठवले यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार सानिया कंट्रक्शन चे मालक मोहन भडकुंबे यांनी मानले.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads