महाराष्ट्र
मंद्रूपचे सामाजिक कार्यकर्ते आर.के. कन्स्ट्रक्शनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड यांच्यामध्ये मंद्रुपला विकासाच्या दिशेने नेण्याचे सामर्थ्य...
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर येथील सर्वात मोठा गाव असणाऱ्या या मंद्रुपमध्ये अनेक नेते आहेत. पण विकासासाठी कोणीही हवे तेवढे प्रयत्न केले नाही.
लोकसंख्येने मोठा असणारा हा गाव विकासाचा भुकेला आहे. या गावामधून अनेक नेते मोठ्या पदावर गेले, पण मंद्रुपला विकासाकडे नेण्यासाठी प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. पण २०१७ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोतीलाल राठोड यांच्या कुटुंबातील सदस्य निवडून आल्यामुळे खऱ्या अर्थाने सेवालाल नगर येथील अनेक वर्षापासून रखडलेल्या विकासकामे प्रत्यक्षात मोतीलाल राठोड यांनी मंद्रुप येथील आदर्श नगर केले आहे. सेवालाल नगर हे एखाद्या शहरातील नगर असल्यासारखे दिसत आहे. मोतीलाल राठोड यांच्या आर.के फाऊंडेशनने सामाजिक कार्यात पुढाकार घेत अनेक योजना राबवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंद्रुप येथे बोअरवेल करून पाण्याचा प्रश्न मिटवून तेथील बालकांना पाणी मिळवून दिले.त्यानंतर अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या हिंदू स्मशानभूमीबाहे पाण्याची व्यवस्था व्हावी व स्मशानभूमी स्वच्छ रहावे याकरिता पाण्याची टाकी बसवून दिले. मंद्रुप एस्टी स्टँड मौलाना आझाद चौक येथे फेवरब्लॉक घालून स्वच्छ करण्यासाठी मदत केले.
मोतीलाल राठोड हे सद्या मंद्रुपला विकासाकडे नेण्याचे सामर्थ्य असल्यामुळे मंद्रुप करांनाही त्यांच्याकडून अपेक्षा वाढत आहेत. राठोड हे पक्षभेद जातभेद न मानणारे व्यक्ती आहेत. त्यामुळेच मंद्रुपकरांमध्ये मोतीलाल राठोड यांच्या विकास कामाबद्दल कौतुक वाटत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा