आजचे राशिभविष्य दि.२१/११/२०२१ - दैनिक शिवस्वराज्य

आजचे राशिभविष्य दि.२१/११/२०२१

मेष (Aries) :

नशिबाची साथ मिळेल. मंगल कामात सहभागी व्हाल. वाणी मधूर ठेवा. सर्व काही तुमच्या बाजूने सुरळीत होवू शकेल. तुम्ही तुमच्या बुद्धीने आणि चतुराईने सर्व काही मर्गी लागेल. कार्यक्षेत्रात यश मिळेल.

वृषभ (Taurus) :

दररोजच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वत:वर लक्ष केंद्रीत करा. अचानक कुठून तरी पैसे कमवू शकता. जे बांधकाम काम करत आहेत, त्यांना मोठा लाभ मिळेल.

मिथुन (Gemini) :

नोकरदार वर्गाला यश मिळेल. पदोन्नती संदर्भात बोलणं होईल. पाल्य गौरव वाटेल असं काही करेल. दिवसाची सुरुवात चांगली असेल. आई-वडिलांचं प्रेम मिळेल. कोणताही निर्णय घेण्याआधी ज्येष्ठांचा सल्ला घ्या.

कर्क (Cancer) :

मनाला एका कामात केंद्रीत करण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक दृष्ट्या तुम्ही स्वतःला सक्षम समजाल. काही अडचणी कमी होतील. तरूणांना करियरमध्ये यश मिळेल.

सिंह (Leo) :

तुमचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. कठोर परिश्रमाच्या बळावर प्रतिकूलतेवर मात कराल. प्रॉपर्टी डीलबाबत निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतात. आपली कमाई सावधगिरीने खर्च करा. कुटुंबातील सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न कराल. वाहन चालवताना काळजी घ्या.

कन्या (Virgo) :

घरातून गोड खावूनत बाहेर पडा. इतरांच्या तुलनेत तुम्ही अधिक यशस्वी व्हाल. आर्थिक व्यवहारांबाबत निर्णय घेताना काळजी घ्या. शैक्षणिक कामात तुमची आवड वाढेल.

तुळ (Libra) :

कामाचा अतिरिक्त ताण असेल. व्यवसायात मार्केटिंग संबंधित कामांमुळे उर्जा संचारेल. आर्थिक स्थिती चांगली झाल्याने जागा किंवा वाहन खरेदी करण्याचा मनात विचार येईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील.

वृश्चिक (Scorpio) :

दिवस चांगला जाईल. लोकांसोबत तुमची जवळीक वाढेल. नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांचा तपास पूर्ण होईल. व्यवसायातून तयार झालेल्या संपर्कामुळे फायदा होईल. तरुणांना प्रेमसंबंधात यश मिळेल.

धनु (Sagittarius) :

नफा कमावण्यासाठी आजचा दिवस खास आहे. तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळाल्याने आनंदी असाल. आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. कोर्टाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला दिलासा मिळले. रोजगाराच्या दिशेने प्रगती होईल. तुमचे मन उपासनेत अधिक गुंतेल. जीवघेणा हल्लाही होऊ शकतो.

मकर (Capricorn) :

मर्जीनुसार आवडतं काम कराल. इतरांना तुमची मतं पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील वडिलधाऱ्यांना पैसे मिळू शकतात. समजूतदार पणाच्या अभावामुळे चांगल्या संधी गमावून शकता. अभ्यासाबाबत विद्यार्थ्यांच्या मनात नवी ऊर्जा येईल.

कुंभ (Aquarius) :

नशिबाची साथ मिळेल. काही लोकांना तुमची उदारता आवडेल. पैसे मिळवण्याची संधी मिळेल. न्यायालयीन प्रकरणातील निकाल तुमच्या बाजूने लागेल. नोकरदार लोकांचा सहकाऱ्याशी वाद होऊ शकतो. त्यामुळे सावध रहा.

मीन (Pisces) :

जीवनात आनंद येईल. तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. चलाखीने काम केल्यास अधिक पैसे कमवू शकता. समाजातील सक्रिय लोकांना इतरांना मदत करण्यात आनंद होईल. कॉलेजमधील प्रेयसीसोबत फिरायला गेल्यास याची कुणकुण तिच्या भावाला लागण्याची शक्यता आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads