आजचे राशिभविष्य दि.२९/११/२०२१
मेष :
नोकरीमध्ये वाद टाळा, राशीचा हर्षल पौर्णिमेच्या सप्ताहात ग्रहांचा पट पूर्ण ताब्यात घेईल.
वृषभ :
चकित करणारे चमत्कार होतील. सप्ताह अपवादात्मक घटना पार्श्वभूमींतून त्रस्त करेल. न दिसणाऱ्या चंद्रग्रहणाचं प्रभावक्षेत्र जपाच.
मिथुन :
मानसिक संतुलन राखावं द्वाड, संतापी किंवा अतिरेकी व्यक्तींना सप्ताहातील ग्रहमान आणि चंद्रग्रहण प्रमाद करवू शकतं, सावधान.
कर्क :
थोरामोठ्यांच्या आशीर्वादातून नोकरीचा लाभ. मोठ्या ग्रहांची लष्करी राजवट राहीलच. दीपावलीची सांगता भांडणानं होऊ देऊ नका.
सिंह :
भागीदाराबरोबरचे गैरसमज टाळा. सप्ताह गृहिणींना अनेक प्रकारांतून सासुरवास देणारा. उद्धटपणा सर्व प्रकारांतून टाळाच.
कन्या :
सुवार्ता आणि बलवत्तर विवाहयोग. सप्ताह न दिसणाऱ्या चंद्रग्रहणाचा; परंतु या ग्रहणाचे परिणाम दिसतीलच. सप्ताहात कुसंगत टाळाच. गिर्यारोहकांनी जपावं.
तुळ :
नोकरीत आचारसंहिता पाळा. सप्ताहात कार्तिकी पौर्णिमेजवळ हर्षलचं साम्राज्य राहील, त्यात मंगळाच्या अतिरेकी कारावायांतून त्रास होऊ शकतात.
वृश्चिक :
सर्व बाबींची काळजी घेणं योग्य. न दिसणाऱ्या चंद्रग्रहणातून टार्गेट होणारी रास. ज्येष्ठा नक्षत्रव्यक्तींना ग्रहणाजवळचे कुयोग अपवादात्मक पार्श्वभूमीवर त्रास देणारे. बाकी ता. १४ ते १६ हे दिवस शुभग्रहांच्या अखत्यारीतले.
धनु : बढतीची शक्यता ग्रहांच्या लष्करी राजवटीतही उत्तम लाभ घेणारी एकमेव रास! अर्थातच, राशीतील शुक्रभ्रमणाची सूक्ष्म स्पंदनं खेचून घेतली तरच. अर्थातच मानसिक प्रक्षेपणं चांगली ठेवा.
मकर : नोकरी - व्यवसायात काळजी घ्या. नोकरी, व्यावसायिक पार्श्वभूमीवर सप्ताह विचित्र पैलू दाखवू शकतो. बदलीचं सावट सतावेल. बाकी धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी राशीतील गुरूचा शेवटचा टप्पा सप्ताहाच्या आरंभी आणि शेवटी उत्तम बोलेल.
कुंभ : तरुणांचा मोठा भाग्योदय. सप्ताहाच्या शेवटी गुरू आपल्या राशीत प्रवेश करेल. सप्ताहाच्या आरंभी शुक्रभ्रमणातून शततारका नक्षत्राच्या व्यक्ती उत्तम लाभ उठवतील.
मीन : अद्भुत लाभ होतील. सप्ताह शुभग्रहांच्या अखत्यारीतलाच राहील. मात्र, मंगळ-हर्षल प्रतियुतीच्या उच्च दाबाचा एक केंद्रबिंदू क्रियाशील राहील. एखादी मानवी दहशत सतावेल.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा