महाराष्ट्र
भीमा नदीवर बेगमपूर येथे बॅरेज चे काम लवकर सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य शैलाताई गोडसे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन..
सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा
मोहोळ:-भिमा नदीवर बेगमपूर येथील बॅरेज नॅशनल हायवे आर्थरटी दिल्ली (NHI)ने मंजूर केला आहे. आम्ही दोन वर्षापासून काम सुरू करण्यासाठी सात्यत्याने पाठपुरावा करत आहे. त्याचे काम अद्याप सुरू केले नाही.जलसंपदा विभागाने NOC देऊन सुध्दा का लवकर काम चालू होत नाही.संबधित विभागातून टाळाटाळ होऊन विलंब होत आहे. बॅरेज चे काम कधी सुरू करणार यांचे ठोस उत्तर मिळत नाही.त्यामुळे या भागातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.संबधित विभागाने काम लवकर सुरू करण्यासाठी वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला व निवेदन दिले परंतु संबंधित विभागाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह दि.29 नोव्हेंबर रोजी भिमा नदीच्या पुलावर आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य सौ.शैला (ताई) गोडसे व शेतकर्यानी निवेदनाव्दारे नॅशनल हाय वे प्रकल्प संचालक कदम साहेब यांना भेटून निवेदन दिले होते.त्याप्रमाणे आज सकाळी 9.30 वाजता इंदिरा नगर बेगमपूर येथे शेतकर्यायांच्या उपस्थित रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी शेतकऱ्यांनी ठोस उत्तर मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही ही भूमिका घेतल्यामुळे आंदोलन बराच वेळ सुरू राहिले यामुळे सोलापूर -कोल्हापूर महामार्गावर वाहनांच्या रांगा लांब पर्यत उभ्या होत्या.वाहतूक बराच वेळ ठप्प होती.यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जोशी साहेब उपअभियंता घोडके यांनी जलसंपदा विभागाने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून नॅशनल हायवे यांच्याकडे सुपूर्द केले आहे असे यांवेळी त्यांनी आपली भूमिका आंदोलका समोर सष्ट केली.तसेच नॅशनल हाय वे प्रकल्प संचालक यांच्याशी फोनवर चर्चा होऊन त्यांचे प्रतिनिधीनी अभियंता जगदाळे यांनी आम्ही प्रस्ताव वरीष्ठ कार्यालय चिंफ जनरल मॅनेजर राष्ट्रीय महामार्ग विभागीय कार्यालय मुंबई येथे पाठविले आहे.आम्ही तात्काळ मंजुरी घेऊन काम लवकर सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ. शैला (ताई) गोडसे,डॉ.बाळासाहेब सरवळे,आप्पासाहेब पाटील, भारत (नाना) माने,भाजप जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पवार,मोहोळ शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले,पोलीस निरीक्षक मानेसाहेब, विनोद अंबारे, गजानन लाड बजरंग शेंडेकर ,नागनाथ माने, सुधाकर पवार ,बालाजी लोहकरे, सुरेश पवार, विनोद सोनवणे ,हरीभाऊ घुले बंडू सरवळे गहिनीनाथ जाधव सिध्देश्वर वराडे,सादिक तांबोळी,गणेश सूर्यवंशी,पांडुरंग सरवळे, खांडेकर साहेब, सुभाष सरवळे,जावेद शेख,लखन माने,अक्षय सुरवसे,आनंद भोसले,अमर कावळे,विनय कलुबर्मी,सागर सुरवसे,सुग्रीव पाटील महादेव सुरवसे, बिरू कोकरे,अज्जू फुलारी तसेच बेगमपूर,अर्धनारी,वडदेगाव, येणकी इ पंचक्रोशीतच शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा