मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन - दैनिक शिवस्वराज्य

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन


समीर शेख सोलापूर जिल्ह्य प्रतीनिधी                                   सोलापूर  :महाराष्ट्र शासनाने जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना बँकेकडून सहज व सोप्या पध्दतीने अर्थसहाय देऊन स्थानिक युवकांना स्वयंरोजगाराकडे प्रेरित करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना कार्यान्वित केली आहे.

जिल्ह्यातील युवक युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळून जिल्ह्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे, त्याद्वारे राज्यात ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सूक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होणेसाठी शासनाच्या आर्थिक  सहायातून प्रकल्प उभारणीस हातभार लावणे असा उद्देश या योजनेचा आहे.

राज्यात स्थानिका अधिवासा असलेल्या व किमान 18 ते 45वयोगटातील स्वयंरोजगार करु इच्छिणारे उमेदवार विशेष प्रवर्गासाठी (अनूसूचित जाती/जमाती/महिला/अपंग/माजी सैनिक) 5 वर्षाची अट शिथिल तर रु.10 लाख मर्यादेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी शिक्षणाची अट नाही. तसेच, रु.10 लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 7 वी पास व रु.25 लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान 10 वी पास.

अर्जदाराने यापूर्वी अनुदान समाविष्ट असलेल्या राज्य तसेच केंद्र शासनाच्या /महामंडळाच्या योजनेतून लाभ घेतलेला नसावा, इत्यादी अटी या योजनेसाठी लागू आहेत. प्रकल्प मर्यादा किंमत-15 ते 35 टक्के पर्यत.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची संपूर्ण ऑनलाईन पध्दतीने अंमलबजावणी होणार आहे, तरी, maha-cmegp.gov.in या पोर्टलवर सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र अर्जदारांनी आपले अर्ज भरुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाव्यसस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर यांनी केले आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads