महाराष्ट्र
मनगोळी ता.द.सोलापूर येथे अज्ञात कारणातून अर्धा एकर ऊस जळून खाक..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथे रविवारी अज्ञात कारणांतून येथील शेतकरी महिबुब हुसेन शेख यांच्या शेतातील अर्धा एकर ऊस जळुन खाक झाला.
जळालेल्या ऊसासंदर्भात उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे येथील सिध्दनाथ साखर कारखाना येथे संपर्क साधले असता ऊसतोडणी साठी रितसर अर्ज करण्यासंबंधी शेतकरी महिबुब शेख यांना सुचवण्यात आले.
अर्ज दिल्यानंतर सिध्दनाथ साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी काळे यांनी क्षणांचा ही विलंब न करता तात्काळ ऊस तोडण्यास परवानगी दिली.त्याच बरोबर सिद्धनाथ कारखान्याचे मनगोळी विभागातील कर्मचारी अतुल पाटील यांनी कारखान्याच्या आदेशाचे पालन करीत पुढील प्रक्रिया करून ऊस तोडणी सुरू केली.यामुळे शेतकरी महिबुब हुसेन शेख यांनी सिध्दनाथ कारखान्याचे व शेतकी अधिकारी काळे व कंदलगाव गटाचे चिटभाई अतुल पाटील यांचे आभार मानले आहेत.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा