महाराष्ट्र
राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी मंद्रूपच्या साहिल कादर याची निवड..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : दिनांक १० ते १२ डिसेंबर २०२१ राेजी अर्धनारी नटेश्वर खाे-खाे क्लब वेळापूर व इंग्लिश स्कूल वेळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेकरीता सोलापूर अॕम्युचर
खो - खो असोसिएशन च्या मान्यतेने जिल्हास्तर अजिंक्यपद निवड चाचणी खो - खो स्पर्धेचे न्यू सोलापूर क्लब सोलापुर यांनी शासकीय मैदान नेहरु नगर सोलापूर येथे दि.२७ ते २८ नाेव्हेंबर राेजी आयोजन केले होते. सोलापूरच्या शासकीय मैदानावर
राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड पार पडली. या झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याच्या पुरुष संघात न्यु गोल्डन स्पोर्ट्स क्लब, मंद्रूप संघातील अष्टपैलु खेळाडू साहिल कादर याची निवड झाली. साहिल कादर हा मंद्रूपच्या न्यु गोल्डन स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू असून त्याला महमद नदाफ व अतुल पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूच्या निवडीबद्दल न्यु गोल्डन स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष बबलु शेख, उपाध्यक्ष डॉक्टर शिवानंद तोरवी, सुनिल टेळे (सर), असिफ शेख, राहुल शिंदे, मुजफ्फर शेख, मळसिध्द शेंडगे, दादा बागवान, लखन शिंदे तसेच न्यु गोल्डन स्पोर्टस क्लबचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा