दक्षिण सोलापूर मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्ष मुसंडी मारणार - कार्यकर्तेंना विश्वास - दैनिक शिवस्वराज्य

दक्षिण सोलापूर मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्ष मुसंडी मारणार - कार्यकर्तेंना विश्वास


डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री, बाळासाहेब शेळके, अर्जुन टेळे यांच्याकडे जबाबदारी असण्याचे चिन्ह,,,,?


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
द.सोलापूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेस पक्ष मुसंडी मारणार असल्याचे कार्यकर्तेंना विश्वास आहे.माजी मंत्री स्व.आनंदराव देवकते यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने तळागाळापर्यंत पोहचून कार्यकर्तेमध्ये एक चैतन्य निर्माण केले होते. अगदी सर्व सामान्य कार्यकर्ते काँग्रेस पक्षाशी आपलं नातं घट्ट केले होते. मध्ये काही काळात गटातल्या राजकारणामुळे कार्यकर्ते पक्षापेक्षा व्यक्तीवरच अधिक प्रेम दाखवल्यामुळे पक्षाकडे दुर्लक्ष झाले.तसल्यातच नेते ही हव्यातच होते.ते कधीही काँग्रेस वाढवण्यासाठी प्रयत्न केले नसल्यानेच २०१४ ला विधानसभेतही आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येही काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षापासून दूर होत गेले.
पण २०१९ च्या निवडणुकीत समाजसेवक असणाऱ्या नगरसेवकांने पक्षाच्या कठिण काळात दक्षिण सोलापूर मतदारसंघात तत्कालीन सहकार मंत्री यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचा झेंडा घेतले.भलेभले उमेदवारी घेण्यापासून हात झटकून मोकळे झाले होते. बाबा मिस्त्री यांना उमेदवारी मिळताच.. जे नकली धर्मनिरपेक्ष असणाऱ्या व्यक्तींनी एका अल्पसंख्यांक व्यक्तीला उमेदवारी मिळाल्याने काँग्रेस पक्षाला सोडत बाबा मिस्त्री यांना एकटे सोडले.. पण यामुळे दूर झालेल्या काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांना एक बळ मिळाले. विधानसभा निवडणुकीत स्व.आनंदराव देवकते यांना मानणारा समाज व तळागाळातील समाजाच्या लोकांनी बाबा मिस्त्री हेच आमचे उमेदवार म्हणून काम केले. यामुळेच मिस्त्री यांनी ताकदवान देशमुख यांच्या समोर आपलं जबरदस्त प्रदर्शन करत ५९००० हजार मते मिळवून पुन्हा काँग्रेससाठी एक आशेचा किरण निर्माण केले.असल्यातच जिल्हाअध्यक्षच्या रुपाने दूरदृष्टी व धर्मनिरपेक्ष असणारे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना जिल्हा काँग्रेसची जबाबदारी मिळताच. शांत झालेल्या कार्यकर्तेमध्ये एक नवीन बळ मिळाले. धवलदादा जिल्हा अध्यक्ष झाल्याने तरुणांच्यामध्ये नवचैतन्य व पुन्हा काँग्रेस पक्ष बळकट होण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. यामुळे प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याने कार्यकर्तेंमध्ये एक उत्साह आहे. यामुळे जिल्हा अध्यक्ष यांनी सुशिक्षित व सामान्य कार्यकर्तेंना संधी दिल्यास पक्ष वाढण्यासाठी मदत होईल.
सद्या दक्षिण सोलापूरमध्ये तालुका अध्यक्ष हरिश पाटील, बाबा मिस्त्री, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, भंडारकवठे चे वसंत पाटील, मंद्रुप काँग्रेसचे जेष्ठ नेते अर्जुन टेळे, काँग्रेस सेवादल ता.द. अध्यक्ष प्रा.उमाशंकर रावत, कंदलगावचे सरपंच रावसाहेब पाटील यांना दक्षिण सोलापूर येथील मंद्रुप ,भंडारकवठे ,व हत्तूर गटात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावा लागेल.काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास अनेकांनी ईच्छुक असल्याचे कळत आहे. कार्यकर्ते सामान्य का असेना तो पक्षाचा काम करणारा हवा. धर्मनिरपेक्ष विचार सारणीचा असावा. याकडे ही पाहणे महत्त्वाचे आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads