Bank Recruitment 2021: सेंट्रल बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या 115 जागांवर भरती, अर्ज कुठे करायचा?
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या 115 जागांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार बँकेच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकतात.
सेंट्रल बँकेतील पदांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर आहे. तर, अर्ज दाखल करण्यास 23 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
शैक्षणिक पात्रता:
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या भरतीसाठी भारत सरकारनं मान्यता दिलेल्या विद्यापीठातून उमेदवार पदवी उत्तीर्ण असावा. तर, पदनिहाय अधिक शैक्षणिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेनं प्रसिद्ध केलेली जाहिरात वाचावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. प्रत्येक पदासाठी किमान 3 ते कमाल 9 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
अर्जाचं शुल्क
सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून इकॉनॉमिस्ट, इनकम टॅक्स ऑफिसर,इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, डेटा सायंटिस्ट,क्रेडिट ऑफिसर,डेटा इंजिनिअर, आयटी सिक्युरिटी अनॅलिस्ट, आयटी एसओसी अनॅलिस्ट, रिस्क मॅनेजर, टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट), फायनांशियल अनॅलिस्ट, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, लॉ ऑफिसर, रिस्क मॅनेजर, सिक्युरिटी ऑफिसर अशा पदासांठी अर्ज मागवण्यात आले आहेत. खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्जाचं शुल्क 850 रुपये आणि जीएसटी तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्याना 175 रुपये आणि जीएसटी असं शुल्क द्यावं लागेल.
ऑनलाईन अर्ज कुठं दाखल करायचा?
पात्र उमेदवारांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या भरतीसाठी https://centralbankofindia.co.in/en/recruitments या वेबसाईटवर अर्ज करावेत. भरती प्रक्रियेतून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची नेमणूक भारतातील कोणत्या शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत केली जाईल. भारतात कुठेही नोकरी करण्याची तयारी असलेले विद्यार्थी अर्ज दाखल करु शकतात.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा