सामाजिक
भंडारकवठे येथील जळीत ग्रस्त कुटुंबास एम के फौंडेशन कडुन संसारोपयोगी साहित्याची मदत..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (भंडारकवठे) : भंडारकवठे येथील भिमाशंकर लायणे यांचे मागील दिवसात घरामध्ये अचानकपणे आग लागल्याने त्यांचे घर जळून पुर्ण खाक झाले यामध्ये त्यांचे काही प्रमाणात रोख रक्कम तसेच संसार उपयोगी सामान पुर्णता जळुन गेले आहेत यासाठी तालुका सरचिटणीस यतीन शहा व भाजपचे जेष्ठ नेते सोमनिंग विरदे यांनी तात्काळ एम के फौंडेशनचे संस्थापक महादेवजी कोगनुरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना येथील हकीकत सांगीतली व पिडीत कुटुंबास मदतीची अपेक्षा व्यक्त केली.समाजसेक महादेवजी कोगनुरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ताबडतोब संसार उपयोगी सामान देण्याचे मान्य केले.
व आज महादेव कोगनुरे यांनी स्वता भंडारकवठे येथे येवुन जळीत कुटुंबास भेट घेऊन त्यांना धीर दिला व संसार उपयोगी साहित्य देऊन त्यांना मदतीचा हात दिला.
यावेळेस भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस यतीन शहा, गुरूलिंग अचलेर, भैरण्णा भैरामडगी, मल्लिकार्जुन दारफळे, अशोक मुक्काणे, सोमनिंग विरदे ,सोमनिंग कमळे, रमेश गिरीगौडर यांच्यासह आदी उपस्थित होते
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा