डाळिंब खोड किड नियंत्रण अभियानात शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे.. - दैनिक शिवस्वराज्य

डाळिंब खोड किड नियंत्रण अभियानात शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे..


  समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी                         सोलापूर.दि.30 : जिल्ह्यामध्ये डाळिंब पिकाखालील सुमारे 4 लाख 73  हजार 77  हेक्टर क्षेत्र असुन ते प्रामुख्याने सांगोला, पंढरपुर, माळशिरस,मंगळवेढा, माढा या भागात विखुरलेले आहे. सद्यस्थितीत सोलापुर जिल्ह्याचे डाळिंब हे मुख्य पिक असताना एकुण फळबाग क्षेत्रााच्या 55 टक्के हिस्सा डाळिंब पिकाचा असताना उत्पादन खोड किड व तेल्यारोग यामुळे धोक्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने सोलापुर जिल्ह्यातील डाळींब पिकाच्या गुंतवणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ही बाब विचारात घेता, जिल्ह्यामध्ये सदर कीडीबाबत शेतकऱ्यांना जणजागृती व कीडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाची उपाययोजना याची माहिती व्हावी. याकरीता कृषि विभाग, आत्मा, राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र सोलापूर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी , कृषि विज्ञान केंद्र , शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी मित्र तसेच जिल्ह्यातील विविध पुरस्कार प्राप्त शेतकरी यांच्या सहभागाने संपुर्ण सोलापुर जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र तसेच जिल्ह्यातील पुरस्कार  प्राप्त शेतकरी यांच्या सहभागाने संपुर्ण सोलापुर जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र असलेल्या क्षेत्रात गावपातळीवर दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी एका दिवसाचे अभियान राबविण्यात येणार आहे.

            तरी सोलापुर जिल्ह्यातील सर्व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या भागातील कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क करुन दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या डाळिंब खोड किड नियंत्रण (Pin Hole Borer), तेलकट डाग व्यवस्थापन व भौगोलिक मानांकन नोंदणी करणे. अभियानामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads