"आदर्श शाळा" बनविण्यासाठी करवंड,टाकळी, सिंदखेड लपाली येथील जिल्हा परिषद शाळेची निवड.!!
करवंड ता.चिखली (विशेष प्रतिनिधी.) :- महाराष्ट्र सरकार कडून राबविण्यात येत असलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातून शेगाव तालुक्यातून टाकळी, मोताळा तालुक्यातून सिंदखेड लपाली व चिखली तालुक्यातील करवंड या तीन गावांची निवड करण्यात आली असून,
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानांतर्गत आदर्श शाळा विकास आराखडा अमलबजावणी करण्यासाठी शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करवंड येथे दिनांक 03/12/2021 रोजी केले होते. या कार्यक्रमात खालील मुद्यावर सविस्तर चर्चा करून आदर्श शाळा विकास कामाचा शुभारंभ केला.
1)आराखड्याचे सादरीकरण केले.
2)स्तर निर्धारणात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नियोजन केले.
3) परसबाग निर्मितीसाठी जागेची निवड केली.
4) विद्यार्थ्यांची वजन, उंची मोजण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे ठरविले.
5) लोकवाटा (रोख किंवा साहित्य) मिळविण्यासाठी गावात कुटुंब स्तर संवाद मोहीम घेणे. यात शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी कार्यकर्ती इ. गृहभेटीतून शाळेसाठी लोकसहभाग मिळविण्याचे ठरविले.
6) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा लोगो तयार करण्याचे नियोजन केले.
7) अभियनाच्या निधीचे दिनांक 31/12/2021 पर्यंत विकास कामे करून , उपयोगिता प्रमाणपत्र देण्याचे ठरले तर या अभियान अंतर्गत मिळालेल्या २'९५'०००(दोन लक्ष पंच्यांनव हजार) रुपयात रंगरंगोटी, प्रयोग शाळा खोली दुरूस्ती, ग्रंथालय पुस्तके, गॅस जोडणी, संगणक अभ्यासक्रमासह, टेबल खरेदी, साऊंड सिस्टीम, बॅनर खरेदी करण्याचे ठरले आहे.
व्ही.एस.टी. एफ.तालुका
समनव्यक विलास बडक
शाळेचे मुख्याध्यापक-इंद्रिस खां पठाण सर
शाळा व्यवस्थापन समिती सभापती-सौ.निता रामेश्वर जाधव उपसभापती-नारायण प्रेम चव्हाण सरपंच-सौ.सपना काशीनाथ मोरे ,ग्राम.पं. सदस्य रामेश्वर राठोड शिवाजी जाधव योगेश चव्हाण हनुमान गरड , शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा