महाराष्ट्र
विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन...
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी सोलापूर, दि. 9 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागसवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह जुने, गाडेगाव रोड, आयटीआय कॉलेज जवळ, बार्शी, जि. सोलापूर येथे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. प्रवेशासाठी अर्ज विनामूल्य वाटप वसतीगृहावर दि. 06 डिसेंबर 2021 पासून सुरु झालेले आहे. वसतीगृहात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, निर्वाह भत्ता, वसतीगृहामध्ये राहण्याची, नाष्टा व दोन वेळेच्या जेवणाची सोय मोफत करण्यात येते. तरी इच्छुक गरजु व पात्र विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतीगृहाचे गृहपाल के. ए. सारंगकर यांनी केलेले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा