कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे 12 ते 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत भव्य राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन.. - दैनिक शिवस्वराज्य

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे 12 ते 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत भव्य राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन..


 

   समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी                                सोलापूर : - राज्यात उद्योग व्यवसाय पुर्ववत सुरु झाल्याने रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत.  उमेदवारांना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने  दिनांक 12 ते 17 डिसेंबर, 2021  या कालावधीत भव्य  राज्यस्तरीय महारोजगार  मेळाव्याचे आयोजन  कौशल्य विकासरोजगार  उद्योजकता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.  त्या अनुषंगाने  https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाव सदर रोजगार मेळावा प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता चे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली आहे.

            राज्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध नामांकित उद्योग  व  व्यवसाय या मेळाव्यामधे सहभागी होत आहेतएलजी इलेक्ट्रॉनिक्स प्रालि., हायरॲप्लायन्सेस,  महिंद्रा सीआय  ऑटोमोटीव्ह लि., फियाट इंडिया प्रालि., आरएसबी ट्रान्समिशन इंप्रालि., ग्रॅव्हिटी कन्स्ल्टंटस प्रालि., पिआयाजो व्हेकल्स, धूत ट्रान्समिशन आदी  नामांकित कंपन्यांसह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामधील कंपन्या या मेळाव्यात विविध प्रकारची रिक्तपदे नोंदवत आहेत .

या मेळाव्यात सर्वसाधारणपणे 9 वी  पास  पासून पुढे किंवा 10 वी व 12 वी,आय.टी.आय., डिप्लोमा तसेच बी. इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्तपदांसह सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले असूनविविध क्षेत्रातील किमान 25 हजार रिक्तपदे उमेदवारांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

            सदरचा मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना या संधीचा लाभ घेण्यासाठी या विभागाच्या  https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट द्यावीहोमपेजवरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी  पासवर्डच्या आधारे लॉगीन करावेत्यानंतर पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉबफेअर या बटनावर क्लिक करुन त्यातील “STATE LEVEL MEGA JOB FAIR 2021” या रोजगार मेळाव्याची निवड करावीयानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रताधारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊनउपलब्ध असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.

            इच्छुक  ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रमानुसार  उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाणदिनांक  वेळ एसएमएसदूरध्वनी-मेल किंवा सोईच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येईल  शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.

तरी नोकरीइच्छुक उमेदवारांनी आपला पसंतीक्रम नोंदवून रोजगाराच्या या सुवर्ण संधीचा निश्चित लाभ घ्यावाअसे आवाहनही  सहायक आयुक्त, श्री. जाधव यांनी केले आहे.

            याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ड्रॉईंग हॉल इमारत, महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला (नॉर्थ कोट), पार्क चौक, सोलापूर येथे प्रत्यक्ष भेटीद्वारे अथवा या कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads